पुणे : चिंचवड विधानसभा मतदारसंघातील (Chinchwad byelection) महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार नाना काटे (Nana Kate) यांनी बुधवारी नवी सांगवी आणि पिंपळे गुरव परिसरात दिवसभर पदयात्रा, गाठीभेटी आणि बैठका घेऊन प्रचारात जोरदार आघाडी घेतली.
आज झालेल्या पदयात्रांमध्ये महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हजेरी लावत एकजुटीचा प्रत्यय आणून दिला. त्यामुळे प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात तरी नाना काटे यांनी वातावरण ढवळून काढल्याचे दिसून आले. यावेळी विद्यानगर, कृष्णा चौक येथे सभा घेण्यात आली.
हे देखील वाचा
Old Pension Scheme of Teachers : शिक्षकांच्या जुन्या पेन्शनसाठी सकारात्मक मार्ग काढणार, मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन
नाना काटे यांच्यासोबत महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस व आरपीआयसह (गवई गट) इतर पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील झाले होते.
मतदारसंघाच्या विविध भागांमध्ये आज दिवसभरात झालेल्या गाठीभेटी आणि पदयात्रांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्यांनी मार्ग सजविण्यात आले होते. फटाक्यांच्या आतषबाजीने परिसर दणाणून जात होता. गल्ली व रस्त्यांवरून पायी चालत नाना काटे यांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या.