Download App

मोठी कारवाई : पुण्यात कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय ड्रग्स सिंडिकेटचा पर्दाफाश; दोघांना अटक

  • Written By: Last Updated:

पुणे :  मुंबईतील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो युनिटने पुण्यातून कार्यरत असलेल्या एका मोठ्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश केला आहे. तीन वेगवेगळ्या प्रकरणांच्या तपासादरम्यान परदेशातून पुण्यात आलेल्या एका पार्सलच्या माध्यामातून हा प्रकार उघडकीस आला आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, तीन ऑपरेशनमध्ये एकूण 1.403 किलो एमडीएमए (2917 गोळ्या), 0.26 ग्रॅम एलएसडी (24 ब्लॉट्स) आणि 1.840 किलो इतर ड्रग्स जप्त करण्यात आले. आतापर्यंत या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. (NCB Busts International Drug Syndicate Operating From Pune)

2024 ला मोदी विरुद्ध प्रियांका? ‘या’ मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरणार

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील तीन कारवायांमध्ये एकूण 1.403 किलो एमडीएमए (2917 गोळ्या), 1.840 किलो हायड्रोपोनिक वीड आणि 0.26 ग्रॅम एलएसडी (24 ब्लॉट्स) जप्त केले आहे, अशी माहिती एनसीबीने शुक्रवारी दिलेल्या निवेदनात दिली आहे. दुसऱ्या ऑपरेशनमध्ये पुण्यातील एक सिंडिकेट दूरच्या देशांतून उच्च-किंमतीची पार्टी ड्रग्स खरेदी करत असल्याचे समोर आले. 7 जुलै रोजी मुंबई येथे एक संशयित पार्सल सापडले जे यूएसएमधून आउटसोर्स करण्यात आले होते.

पुण्यातून एकाला अटक

एनसीबीच्या स्थानिक पथकाने 10 ऑगस्ट रोजी पुण्यातून एस. कश्यप नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. पुण्यात आलेल्या पार्सलचा सखोल तपास केल्यानंतर कश्यपची माहिती समोर आल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे. चौकशीमध्ये ड्रग पेडलरच्या सदस्यांसह संदिग्ध भागात कश्यप अवैधपणे काम करत असल्याचे उघड झाले आहे. कमिशनच्या बदल्यात कश्यप हा परदेशातील हँडलरकडून ड्रग्स खरेदी करत होता आणि पुण्यात ते विक्री करण्यातही त्याचा सहभाग होता. एनसीबीचे अधिकारी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

ब्रिटीश कायदा रद्द, पण त्यांच्यापेक्षा भयंकर… संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका

पहिल्या कारवाईत एनसीबीच्या अधिकार्‍यांना एका आंतरराष्ट्रीय सिंडिकेटची माहिती मिळाली होती. यात युरोप आणि अमेरिकेतून अनेक विदेशी ड्रग्जची तस्करी करण्याची योजना आखण्यात आली होती. 23 जून रोजी यूकेहून पुण्याला पाठवलेले एक संशयास्पद पार्सल मुंबईत ट्रॅक करून रोखण्यात आले. हे पार्सल उघडले असता यात 100 निळ्या रंगाच्या MDMA गोळ्या आणि 24 एलएसडी ब्लॉट पेपर आढळून आले.

Tags

follow us