Download App

“अजून म्हातारा झालेलो नाही, भल्याभल्यांना सरळ करण्याची माझ्यात ताकद” : खेडच्या घाटातून पवारांचा शड्डू

पुणे : सगळ्या भाषणांमध्ये मी 83 वर्षाचा झालो, 84 वर्षाचा झालो, असे म्हणतात. पण तुम्ही माझं काय बघितलं अजून, मी काही म्हातारा झालो नाही. भल्याभल्यांना सरळ करण्याची माझ्यात ताकद आहे. तुम्ही काही चिंता करु नका, अशा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्यांच्या राजकीय विरोधकांना दिला. मात्र पवार यांचा रोख अर्थातच राष्ट्रवादीचे बंडखोर आमदार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर होता. (NCP President Sharad Pawar warned NCP rebel MLA and Deputy Chief Minister Ajit Pawar)

खेड तालुक्यातील घाटावर शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘साहेब केसरी’ बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला खासदार अमोल कोल्हे यांच्यासह राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना पवार यांनी खासदार कोल्हेंचे, बैलगाडा शर्यतीचे कौतुक केले आणि विरोधकांना इशाराही दिला.

Elections 2024 : महाराष्ट्रात भाजपाचा एमपी-राजस्थान पॅटर्न? आमदार-खासदारांचं तिकीटच ‘अनसेफ’

शरद पवार म्हणाले. आतापर्यंत अनेक शर्यती टीव्हीवर पाहिल्या. पण घाटात आल्याशिवाय डोळ्यांचे पारणे फिटत नाही. खासदार अमोल कोल्हे यांनी हा प्रश्न संसदेत मांडला आणि तो सोडविण्यासाठी प्रयत्न केला. दिलेला शब्द पूर्ण केला. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बैलगाडा शर्यत सुरु आहेत, असे म्हणत अमोल कोल्हे यांचे कौतुक केले.

पवार पुढे म्हणाले, या सरकारमध्ये शेतकऱ्यांबाबत आस्था नाही. कांद्यासह शेतमालाला भाव नाही. कांद्याची निर्यातबंदी केली. शेतकऱ्यांवर संकट ओढण्याचे काम होत आहे. मात्र आपण एकजुटीने महाराष्ट्राचे चित्र बदलणार आहोत. जे काही तुमचं दुखणं आहे ते लवकरच दूर करु, यासाठी जे काही करावे लागेल, ते सर्व आपण मिळून करु. लवकरच नवा इतिहास घडवू.

Animal Movie Marathi Seen : आधी नकार नंतर होकार, उपेंद्रनं असा साकारला ‘अ‍ॅनिमल’चा ‘फ्रॅडी’ !

पण माझी एक तक्रार आहे. सगळ्या भाषणांमध्ये मी 83 वर्षाचा झालो, 84 वर्षाचा झालो, असे म्हणतात. पण तुम्ही माझं काय बघितलं अजून, मी काही म्हातारा झालो नाही. भल्याभल्यांना सरळ करण्याची माझ्यात ताकद आहे. तुम्ही काही चिंता करु नका, असा इशाराही शरद पवार यांनी दिला.

Tags

follow us