Download App

News Area India Survey Pune : दत्तात्रय भरणे, शिरोळे, टिंगरे आणि कांबळे यांच्यासाठी धोक्याची घंटा

  • Written By: Last Updated:

News Area India Survey : पुणे शहर व जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघातील 2024 च्या निवडणुकीतील कल काय असू शकेल याचा अंदाज . ‘न्यूज एरिना इंडिया’ (News Area India) या सर्व्हे संस्थेने जाहीर केला आहे. या संस्थेने कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा अंदाज व्यक्त करत काँग्रेसला बहुमत दाखवले होते. त्यानंतर आता या संस्थेने महाराष्ट्रातील मतदारसंघ निहाय सर्वेक्षण जाहीर केले आहे. या सर्वेक्षणानुसार भाजप पुन्हा सरकार स्थापन करू शकते असा दावा करण्यात आला आहे.
राज्यात सध्या सर्व्हे वॉर सुरू आहे. जो तो आपापल्या सोयीने या सर्वेक्षणाचे आकडे मांडत आहे. सकाळ आणि साम यांनी केलेल्या सर्वेक्षणानंतर झी न्यूजने आपला सर्व्हे जाहीर केला होता. त्यानंतर आता ‘द न्यूज एरिना’ चा सर्व्हे समोर आला आहे. या सर्व्हेत नुकत्याच झालेल्या कसब्यातील पोटनिवडणुकीत विजयाची पताका फडकवणारे रवींद्र धंगेकरदेखील पराभूत होण्याच्या मार्गावर असल्याचा दावा यात वर्तवण्यात आला आहे.

News Area India Survey Pune : दत्तात्रय भरणे, शिरोळे, टिंगरे आणि कांबळे यांच्यासाठी धोक्याची घंटा

पुणे शहर आणि जिल्ह्यात भाजप मारणार बाजी
या सर्व्हेनुसार पुणे शहर आणि जिल्ह्यातील 21 पैकी 9 जागा भाजपला, 8 जागा राष्ट्रवादीला आणि 4 जागा काँग्रेसला मिळू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा सर्व्हे जर खरा ठरला काँग्रेसच्या जागा जवळपास दुप्पट होतील. भाजपाला 2019 च्या निवडणुकीत 9 जागा मिळाल्या होत्या. कसबा पोट निवडणुकीच्या निमित्ताने ही संख्या आठवण आली होती. मात्र 2024 मध्ये भाजप पुन्हा 9 जागांवर राहणार असल्याचे या सर्व्हेत म्हटले आहे.

https://letsupp.com/maharashtra/western-maharashtra/news-arena-india-survey-ahmednagar-ncp-bjp-how-many-seat-won-59169.html

 

आमदार दत्तात्रय भरणे आणि सुनील टिंगरेंच्या जागा धोक्यात?
विशेष म्हणजे भाजपाच्या हातातून शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट हे दोन विधानसभा मतदारसंघ जाणार असल्याचे या सर्व मध्ये म्हटले आहे. याचा अर्थ विद्यमान आमदार अनुक्रमे सिद्धार्थ शिरोळे आणि सुनील कांबळे या दोघांसाठी हा सर्व्हे प्रतिकूल आहे, तर दुसरीकडे काँग्रेसचे संभाव्य उमेदवार दत्ता बहिरट आणि रमेश बागवे यांच्यासाठी गुड न्यूज ठरू शकतो. दुसरीकडे राष्ट्रवादीचे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे आणि वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांच्या जागाही डेंजर झोनमध्ये असल्याचे सर्व्हेमध्ये दिसून आले आहे.

दोन सर्व्हेमध्ये पिछाडीवरील फडणवीस आले आघाडीवर; भाजप स्वबळावर गाठणार सव्वाशेचा आकडा

या दोन्ही ठिकाणी भाजपचा विजय होईल असा दावा करण्यात आला आहे.,असे झाले तर ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील आणि भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचे पुन्हा आमदार होण्याचे स्वप्न साकार होऊ शकेल, तर, इतर विधानसभा मतदारसंघात 2019 प्रमाणेच निकाल लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तेथे कोणताही बदल होणार नाही त्यामुळे तेथील विद्यमान आमदारांना हा सर्व्हे वाचून आनंद होईल अशी स्थिती आहे. पण प्रत्यक्षात हा सर्व्हे सत्यात उतरेल का? यासाठी अद्याप सव्वा वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे. त्यामुळे प्रत्यक्षात काय निकाल लागेल यासाठी 2024 पर्यंत वाट पाहण्याची गरज आहे.

Pune – BJP : 9, INC : 4, NCP : 8

Junnar : NCP
Ambegaon : NCP
Khed Alandi : NCP
Shirur : NCP
Daund : BJP
Indapur :BJP
Baramati : NCP
Purandar : INC
Bhor : INC
Maval : NCP
Chinchwad : BJP
Pimpri (SC) : NCP
Bhosari : BJP
Vadgaon Sheri : BJP
Shivajinagar : INC
Kothrud : BJP
Khadakwasla : BJP
Parvati : BJP
Hadapsar : NCP
Pune Cantonment (SC) : INC
Kasba Peth : BJP In Pune, tactical alliance with MNS might help BJP.

 

 

Tags

follow us