Download App

आमची डोकी वाचतील तोपर्यंत तुमचं काही खरं नाही, जीवघेण्या हल्ल्यानंतर वागळेंचं विस्फोटक भाषण

Nikhil Wagale : हल्ल्यात आमची सर्वांची डोके वाचले. त्यामुळे जोपर्यंत आमची डोकी वाचली तोपर्यंत हल्लेखोरांनो तुमचं काहीही खरं नाही. असा इशारा ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे (Nikhil Wagale) यांनी दिला. त्यांच्या पुण्यातील ‘निर्भय बनो’ या कार्यक्रमादरम्यान भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांनी पोलीस संरक्षणात कार्यक्रम स्थळी येत असलेल्या निखिल वागळे यांची गाडी फोडली. मात्र या घटनेनंतर देखील पोलीस संरक्षणामध्ये निखिल वागळे हे कार्यक्रम स्थळी दाखल झाले. त्यांनी या कार्यक्रमात विस्फोटक असं भाषण केलं. यावेळी त्यांनी हल्ल्याचा थरारक अनुभव सांगितला.

पुण्यात भाजप कार्यकर्त्यांची अरेरावी : ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळेंवर हल्ला, गाडी फोडली, अंडी फेकली

यावेळी बोलताना निखिल वागळे म्हणाले की, कार्यक्रमाला येत असताना आमच्यावर जेव्हा हल्ला होत होता. तेव्हा मी प्रचंड धक्क्यात होतो. ज्या क्षणाला हल्ला होत होता. गाडीच्या काचा फुटत होत्या. गाडीची मागची काच फोडली त्यावेळी असीमने माझ्या डोक्यावर हात ठेवला. सोबत दोन मुली होत्या. एक पुढच्या सीटवर बसलेली होती. तिला मी खाली वाकवलं. त्यामुळे आमची सर्वांची डोकी वाचली. त्यामुळे जोपर्यंत आमची डोके वाचतील तोपर्यंत हल्लेखोरांनो तुमचं काहीही खरं नाही. असा इशारा यावेळी वागळे यांनी दिला.

CM शिंदेंसाठी प्रविण तरडेंची खास पोस्ट; म्हणाले, ‘शेतकऱ्याच्या कुटुंबातून…’

पुणे हे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे शहर आहे. मात्र गेल्या शंभर वर्षांपासून या शहराचा हल्लेखोरांचा इतिहास आहे. त्यामुळे या शहराला कलंक लागला आहे. 1942 साली देखील याच शहरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आचार्य अत्रे यांची देखील सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केला होता. त्याचबरोबर नथुराम गोडसे देखील याच शहरातले आहेत. त्यामुळे आचार्य अत्रे यांनी म्हटल्याप्रमाणे आम्हाला मारणारे मेले पण आम्ही जिवंत आहोत.

पण मी अहिंसावादी माणूस असल्याने मी असं म्हणेल की, आम्हाला मारणारे देखील जिवंत राहो आणि आम्ही देखील जिवंत राहो. तसेच या सर्व हल्लेखोरांना मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन सांगतो की, मी तुम्हाला माफ केले. महात्मा फुले यांना देखील अशाच प्रकारे मारायला काही लोक आले होते मात्र त्यांनी त्यांचे परिवर्तन केलं आणि नंतर मारायला आलेले लोकच त्यांचं कार्य करू लागले. त्यामुळे मला जरी संधी मिळाली. तर मी या भाजपवाल्यांचं परिवर्तन करून टाकेल. माझ्यावर होणारा हा सातवा आठवा हल्ला आहे. 1979 साली माझ्यावर पहिला हल्ला झाला होता.

follow us