Download App

Nilesh Lanke यांचा राधाकृष्ण विखेंना मुख्यमंत्री पदासाठी नकार!

  • Written By: Last Updated:

पिंपरी : राज्याचे मुख्यमंत्री (Chief Minister) पदाचे उमेदवार म्हणून येणाऱ्या काळात भाजपकडून (BJP) राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrushna Vikhe-Patil) यांच्या नाव पुढे येईल, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे (VBA) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केले होते. विखे जर मुख्यमंत्री झाले तर तुम्हाला आवडेल का या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. निलेश लंके म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार मला मुख्यमंत्री झाल्याचे पाहायला आवडेल. मग ते अजित पवार (Ajit Pawar) असो की इतर कोणीही जो पक्ष निर्णय घेईल, तो मान्य असेल असे देखील लंके यांनी म्हटले आहे.

चिंचवड पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रचारासाठी निलेश लंके आले असता. त्यांनी ‘लेट्सअप’शी संवाद साधला. त्यावेळी अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली.

काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी भाजपकडून राधाकृष्ण विखे-पाटील तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून घोषित केले जाईल, असे वक्तव्य केले होते. त्यावर बोलताना निलेश लंके म्हटले की, मला इतर पक्षांपेक्षा माझ्या राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार मुख्यमंत्री म्हणून पाहायला आवडेल. आमचं पक्षनेतृत्व ज्याचे नाव निश्चित करेल तो व्यक्ती मुख्यमंत्री झाल्यास अधिक आनंद वाटेल.

निलेश लंके म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसने येणाऱ्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत खासदारकी लढा असा आदेश दिला तर मी कोणाच्याही विरोधात लढायला तयार आहे. माझ्यासाठी पक्षाचा आदेश अंतिम आहे. मग समोर राधाकृष्ण विखे-पाटील असो की अन्य कोणीही असो. मला काही फरक पडत नाही.

गेल्या अनेक महिन्यांपासून अहमदनगर शहराच्या नामांतराचा प्रश्न चर्चेत आहे. त्यासाठी आंदोलन, मागण्या पुढे येत आहे. मी माझी भूमिका यापूर्वीही जाहीर केली आहे. अहिल्यादेवी होळकर यांचे कर्तृत्व मोठे आहे. अहमदनगर शहराला अहिल्यानगर हे नाव दिल्यास माझा त्याला पाठिंबा असेल, असे देखील निलेश लंके यांनी यावेळी स्पष्ट केले.

Tags

follow us