Pune Dagadusheth Ganpati : गणेश जयंतीनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन

पुणे : माघी श्रीगणेश जयंतीनिमित्त (Maghi Ganesh Jayanti) श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट (Dagdushet Ganpati mandir) आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीनं गणेश जन्म सोहळा मंदिरात आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्तानं आज पहाटे 4 ते सकाळी 6 यावेळेत पद्मश्री उस्मान खान यांनी सतारवादनातून श्रीं चरणी स्वराभिषेक अर्पण केला. भाविकांमध्ये माघी गणेश जंयंतीनिमित्त मोठा उत्साह पाहायला मिळाला. […]

Untitled Design (6)

Untitled Design (6)

पुणे : माघी श्रीगणेश जयंतीनिमित्त (Maghi Ganesh Jayanti) श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट (Dagdushet Ganpati mandir) आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीनं गणेश जन्म सोहळा मंदिरात आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्तानं आज पहाटे 4 ते सकाळी 6 यावेळेत पद्मश्री उस्मान खान यांनी सतारवादनातून श्रीं चरणी स्वराभिषेक अर्पण केला. भाविकांमध्ये माघी गणेश जंयंतीनिमित्त मोठा उत्साह पाहायला मिळाला.
YouTube video player
आज पहाटे 3 वाजता मंदिरात ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक देखील झाला. मंदिरावर तिरंगी फुलांची आकर्षक सजावट व विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. मंदिर पहाटे 3 पासून दर्शनासाठी खुले करण्यात आल्याने भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

माघी श्रीगणेश जयंतीच्या (Ganesh Jayanti) पार्श्वभूमीवर शिवाजी मार्गावरील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदीर येथे दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता आज 25 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजेपासून गर्दी संपेपर्यंत वाहतूकीस बंदी करण्याबाबतचे आदेश देण्यात आले आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन शहर पोलीस वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.

अग्निशमन वाहने, पोलीस वाहने, रुग्णवाहिका या अत्यावश्यक सेवेतील वाहनांना ही बंदी असणार नाही. स. गो. बर्वे चौक येथून शिवाजी रोडने स्वारगेटकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड वाहतुकीस पीएमपीएमएल बसेस वगळून बंदी असेल. प्रीमियर गॅरेज चौक ते मंगला सिनेमागृहासमोरुन नागदेव ऑईल डेपो चौक दरम्यान तात्पुरत्या स्वरुपात नो-पार्किंग, नो-हॉल्टींग करण्यात आलं आहे.

Exit mobile version