Download App

पुण्यात पाकिस्तानी नागरिकाला बेड्या; चौकशीकडे सर्वांचं लक्ष

  • Written By: Last Updated:

Pune Police Arrested Pakistani Men : पुण्यात बेकाशीर वास्तव्य करणाऱ्या एका पाकिस्तानी नागरिकाला पोलिसांच्या विशेष पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. अशाप्रकारे शहरात पाकिस्तानी नागरिक वास्तव्य करत असल्याचे समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या व्यक्तीचा बनावट भारतीय पासपोर्ट जप्त केला आहे.

‘राज्यात सध्या ‘मुका घ्या मुका’ सिनेमा सुसाट; सुर्वे पहिले गुन्हेगार’

महम्मद अमान अन्सारी (वय २२) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून, त्याच्या विरोधात पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विशेष शाखेतील परकीय नागरिक पडताळणी विभागातील पोलीस कर्मचारी केदार जाधव यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी नागरिक अन्सारी नावाची व्यक्ती बेकायदेशीरपणे वास्तव्य करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी याचा तपास केला असता अन्सारीला भवानी पेठ परिसरातून अटक केली. चौकशीदरम्यान त्याच्या बनावट भारतीय पासपोर्ट आढळून आला. सध्या पोलीस अन्सारीकडे कसून चौकशी करत असून, नेमका तो कोणत्या उद्देशाने शहरात वास्तव्य करत होता. त्याच्या संपर्कात कोण कोण होते याचा तपास केला जात आहे. मात्र, अशाप्रकारे पाकिस्तानी नागरिक शहरात आढलून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

अन्सारी बनावट कागदपत्रांद्वारे भारतीय पासपोर्ट मिळवल्याचे सांगितले जात आहे. एवढेच नव्हे तर, त्याने याच पासपोर्टच्या आधारे पुणे ते दुबई असा प्रवास केल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे खळबळ अडाली असून, पोलीस अन्सारीची कसून चौकशी करत आहेत. पुण्यात देश आणि जगभरातून करोडो लोकं येत असतात. मात्र, अन्सारी हा नेमका कोणत्या कारणासाठी पुण्यात वास्तव्य करत होता तसेच तो शहरातील कोणत्या व्यक्तींशी संपर्कात होता? त्याला बनावट पासपोर्ट काढण्यासाठी कुणी मदत केली आहे का? असे एक ना अनेक प्रश्न अटकेनंतर उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान, पोलीस तपासात आता अन्सारी कोणकोणते खुलासे करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, पोलिसांकडून अन्सारीच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींचादेखील युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे.

Tags

follow us