पार्थ पवारांचं मुंढवा जमीन खरेदी प्रकरण… चौकशी करणारे अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात

Parth Pawar यांनी जमीन विकत घेत सरकारची फसवणूक केली त्यामागे अधिकारी व राजकारण्यांचे संगनमत आहे. असे आरोप विजय कुंभार यांनी केले.

Parth Pawar

Parth Pawar

Parth Pawar’s Mundhwa land purchase case… Investigating officers under suspicion : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांनी 40 एकर जमीन फक्त 300 कोटी रुपयांमध्ये विकत घेत सरकारची फसवणुकीचा आरोप होत आहे. त्यानंतर काहींवर गुन्हे दाखल झाले आहेत. चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे, तर अजित पवार यांनी हा व्यवहार रद्द झाला आहे. मात्र या प्रकरणात आता चौकशी करणारे अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात आले आहे. कारण या शासकीय जमिनीचा मोठा गैरव्यवहारात अधिकाऱ्यांचे व राजकारण्यांचे संगनमत आहे. असे आरोप सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी शासनाने तत्काळ स्वतंत्र चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

https://x.com/VijayKumbhar62/status/1987756486555246826

चौकशी करणारे अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात…

याबाबात बोलताना विजय कुंभार म्हणाले की, मुंढवा सर्वे नं. 88 चा घोटाळा अधिकाधिक गंभीर होत चालला आहे. त्याबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सखोल चौकशीची मागणी करणारं पत्र लिहिलं आहे. कारण एक पत्र समोर येत आहे. जो 2021 चा शासनाचा जीआर आहे. ज्यामध्ये म्हटलं आहे की,कनिष्ठ वतनांच्या जमिनी हस्तांतरित करायच्या असतील तर त्यासाठी शासनाची पूर्व मंजूरी हवी असते. नजराना रक्कमही शासनाने निर्धारिक केलेली असावी. असं असूनही शितल तेजवानीने फक्त कलेक्टरला पत्र देत 11 हजार भरले. त्यामध्ये अशी रक्कम भरताना शासनाची मान्यता आणि रक्कम कशासाठी भरली जात आहे. ही माहिती देणे आवश्यक असते. मात्र अशा कोणतीही माहिती नसताना हे पैसे भरून घेतले गेले.

मोठी बातमी : चाकणकरांना डिवचणं भोवलं; रूपाली पाटील ठोंबरे यांची प्रवक्तेपदावरून उचलबांगडी

दुसरीकडे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. त्यामध्ये जे अधिकारी आहेत. त्यांना या प्रकरणाबाबत माहिती होती. मात्र आता ते माहिती नसल्याचं दाखवत आहेत. पण असे अधिकारी या प्रकरणाच्या चौकशी करणाऱ्या समितीमध्ये असतील तर चौकशी पारदर्शकपणे कशी होईल? असा सवाल उपस्थित करत सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी शासनाने या प्रकरणाची तत्काळ स्वतंत्र चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

Exit mobile version