Download App

पीसीसीओईमध्ये ‘पंतप्रधान इंटर्नशिप योजना’; अग्रगण्य कंपन्यांमध्ये संधी मिळणार

पुण्यातील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या माहितीसत्राचे आयोजन येत्या 11 फेब्रुवारीला करण्यात आलंय.

Pune News : पिंपरी चिंचवड एज्यूकेशन ट्रस्ट संचलित पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या माहितीसत्राचे आयोजन करण्यात आलंय. येत्या 11 फेब्रुवारीला पीसीईटी ऑडिटोरियममध्ये या माहितीसत्राचे आयोजन करण्यात आले असून अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसह तीन वर्षांत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करुन घेण्यात येणार आहे.

धनंजय मुंडेंचा मी राजीनामा मागितला नाही पण त्यांच्या अनेक फाईल..आमदार धसांनी फोडला नवा बॉम्ब

पंतप्रधान इंटर्नशिप योजना ही भारत सरकारची एक महत्वपूर्ण योजना असून या योजनेतंर्गत 21 ते 24 वयोगटातील तरुणांना देशातील सुमारे 500 अग्रगण्य कंपन्यांमध्ये सुमारे 1 कोटी इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध होणार आहे. या इंटर्न विद्यार्थ्यांना दरमहा स्टायपेंड देखील दिलं जाणार आहे.

तरुणांना उद्योग क्षेत्रात लागणाऱ्या कौशल्यांनी सुसज्ज करुन नोकरीसाठी तयार करणे आणि विद्यार्थ्यांच्या करिअरला चालना देणे हा पंतप्रधान इंटर्नशिप योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेसाठी महाविद्यालयातील अभियांत्रिकी, विज्ञान, कला वाणिज्य, बीसीए, बीसीएस, व्यवस्थापनशास्त्र इ. शाखेतील विद्यार्थ्यांनी या माहितीसत्रात सहभागी होऊन पंतप्रधान इंटर्नशिप योजनेचा लाभ घेण्याबाबतच आवाहन पीसीईटीच्या सेंट्रल प्लेसमेंट सेलचे अधिष्ठाता डॉ. शीतलकुमार रवंदळे यांनी केलंय.

अण्णाही अनेक वर्ष ‘आप’दे मध्ये अडकले; आपला फटकारताना मोदींकडून आण्णा हजारेंचाही उल्लेख

माहितीसत्रात सहभागी होण्याकरिता खालील लिंकवर रजिस्ट्रेशन करावे :
https://tinyurl.com/PMinternship22

सदर कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्थ हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई व प्राचार्य डॉ. गोविंद कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

follow us

संबंधित बातम्या