Download App

प्रसिध्द गायक महेश काळेंच्या सांगीतिक मेजवाणीचा पुणेकरांनी घेतला आस्वाद

  • Written By: Last Updated:

पुणे : दिवाळीचं औचित्य साधून प्रसिद्ध गायक महेश काळे (Mahesh Kale) यांच्या शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यांच्या गायनाच्या सुरेल मैफलीचा आस्वाद सोमवारी सायंकाळी पुणेकरांनी घेतला. भाजपचे शहर चिटणीस लहू बालवडकर (Lahu Balwadkar) यांच्या लहू बालवडकर सोशल वेलफेअरतर्फे दिवाळी विशेषमध्ये महेश काळेंचा सुर संध्या कार्यक्रम पार पडला. यावेळी याचि देही याची डोळा, अशी अनुभूती घेण्याची संधी रसिकांना मिळाली.

कुत्रा चावल्यास नुकसान भरपाई मिळणार! दाताच्या प्रत्येक खुणेमागे 10 हजार देण्याचे हायकोर्टाचे आदेश 

या गायनाच्या मैफलीचं दीपप्रज्वलन पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर गायनाच्या कार्यक्रमाला सुरूवात झाली. या कार्यक्रमाला भाजपचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह असंख्य रसिक चाहत्यांनी हजेरी लावली होती.

यावेळी मोहोळ म्हणाले की, लहू बालवडकर हा एका राजकीय पक्षाचा काम करणारा सच्चा कार्यकर्ता आहे. परंतु केवळ राजकारण, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते काम करत नाहीत. अनेक वर्षांपासून ते समाजातील सर्व घटकांसाठी काम करतांना दिसतात. कोविड सारख्या काळातही त्यांनी बाणेर, बालेवाडी परिसरात चांगलं काम केलं आहे. केवळ नागरिकांच्या दैनंदिन समस्या, अडचणीच नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकीच्या जाणीव निर्माण करणारे अनेक उपक्रम लहू बालवडकर सोशल वेलफेअर संस्था करतांना दिसत आहे, अशा शब्दात मोहोळ यांनी कौतूक केलं.

नवी दिल्ली-दरभंगा एक्सप्रेसला भीषण आग; जीव वाचविण्यासाठी चालत्या रेल्वेतून प्रवाशांच्या उड्या 

डेंग्यू आजाराची साथ शहरात असतांना रक्ताची कमतरता असल्याचे लक्षात घेऊन त्यांनी मागच्या तीन दिवसांपूर्वी या ठिकाणी रक्तदान शिबिर घेतलं. त्यात 1300 रक्त पेशीचं संकलन या सगळ्यांनी मिळून केलं, असं मोहोळ यांनी सांगितले.

सामाजिक आणि राजकीय काम सगळेच करतात. मात्र, समाजाप्रती असलेली संवेदना दाखवण्याचं काम क्वचित लोकं करतात. त्यामध्ये लहू बालवडकर यांचे नाव आग्रहाने घेतले जाते. बालवडकर यांनी चैतन्य स्पर्श या नावाने भारतातल्या बारा शक्तीपीठांच्या पादुकांचा दर्शन सोहळा सलग तीन वर्ष आयोजित करून पंचवीस हजार पेक्षा जास्त नागरिकांना त्या पादुकांचे दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ बालवडकर सोशल वेल्फेअरच्या माध्यमातून दिला. दिवाळी आंनदाची जाऊ म्हणून पंधरा हजार लोकांना अन्नदान करण्याचं काम ते गेली कित्येक वर्षापासून करत असल्याचं भाजपचे उपाध्यक्ष राजेश पांडे यांनी म्हटले.

दरम्यान, सुर संध्या या कार्यक्रमात महेश काळे यांनी कार्यक्रमाची सुरुवात शास्त्रीय संगीताने केली. या कार्यक्रमात पुर्वाधार्थ त्यांच्या नावाजलेल्या सुमधुर संगीताने केली तर उत्तरार्ध भागात रसिकांना सुचवलेल्या संगतीने मैफल सजवली.

यावेळी पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, राज्याचे ओबीसी सरचिटणीस प्रल्हाद सायकर, कोथरुड विधानसभा उत्तर विभाग अध्यक्ष सचिन पाषाणकर, सचिन दळवी, राहूल कोकाटे,उमा गाडगीळ, अस्मिता करंदीकर, कल्याणी टोकेकर, रिना सोमय्या, उत्तम जाधव आदी उपस्थित होते.

Tags

follow us