BJP Candidate Pooja More Application Withdrawn : फडणवीस आम्ही आरक्षण मागतोय तुमची बायको नाही असे थेट विधान करणाऱ्या पहलगामवरुन मोदींवर टीका करणाऱ्या भाजपची उमेदवारी मिळेल का? असं विचारलं तर, तुमचं उत्तर नाही हेच असेल. पण, थोडं थांबा फडणवीसांची बायको आणि मोदींवर थेट टीका करणाऱ्या पूजा मोरे यांना भाजपनं पुण्यातील प्रभाग क्रमांक 2 मधून उमेदवारी दिली होती. पण, भाजपच्या केंद्रापासून राज्यापर्यंतच्या बड्या नेत्यांवर टीका करणाऱ्या, पहलगाम हल्ल्यासंदर्भात वेगळी भूमिका घेणाऱ्या पूजा मोरे जाधव यांना उमेदवारी देणं भाजपप्रेमींना पटलेलं नव्हतं. सोशल मीडियावार याबाबत असंख्य पोस्ट करण्यात आल्या. विरोधाची हीच लाट पाहून अखेर पूजा जाधव मोरे यांनी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा कधी ; अजितदादांनी थेट तारीखच सांगितली
पूजा जाधव नेमक्या कोण?
पुण्यातील प्रभाग क्रमांक 2 म्हणजेच फुलेनगर नागपूर चाळ येथून पूजा यांना भाजपनं अधिकृत उमेदवारी दिली होती. पण, उमेदवारी जाहीर झालेल्या क्षणापासून भाजप समर्थकांमध्ये नाराजी पसरली होती. त्याचाच एकभाग म्हणून, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेकजण थेट व्यक्त झाले होते. मोठ्या प्रमाणात विरोध झाल्यानंतर उमेदवारी मागे घेणाऱ्या पूजा या मूळ बीड जिल्ह्यातील गेवराईच्या असल्याचे सांगितले जातयं. जुलै 2025 रोजी पूजा यांनी पुण्यामध्ये 5 हजार किलो चिकनचे मोफत वाटप केले होते तेव्हापासूनचं त्यांची चर्चा व्हायला सुरूवात झाली होती.
पूजा यांची ही पहिलीच राजकारणातील इनिंग होती का? तर, नाही त्या याआधी प्रभाग क्रमांक 1 मधून निवडणुकीच्या रिंगणात होत्या. एवढेच काय तर, पूजा यांनी 2024 मध्ये गेवराई येथून विधानसभेची निवडणूकही लढवली होती. संभाजीराजे छत्रपती यांनी काढलेल्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षातर्फे त्यांना उमेदवारी देण्यात आली होती.
पूजा जाधव यांच्या उमेदवारीला एवढा विरोध का केला गेला?
पूजा धनंजय जाधव यांनी आरक्षणाच्या मुद्दावरून बोलताना ‘आरक्षण मागतोय तुमची बायको नाही’ असे विधान केले होते. जिनं फडणवीसांची बायको काढली आणि पहलगामवरुन मोदींवर टीका केली तिलाच तिकीट देऊन तिच्याच सभेच्या सतरंज्या मोहोळ आणि फडणवीस भाजप निष्ठावंतांना उचलायला लावणार. आणि म्हणे कार्यकर्त्यांचा पक्ष असे म्हणत भाजप समर्थक व्यक्त होण्यास सुरूवात झाली होती.
सोशल मीडियावर व्यक्त होताना महेंद्र देवडे यांनी फेसबुक पोस्ट करत जाधव यांनी पत्करलेलं हिंदुत्व बेगडी असल्याचे म्हणत हिला तिकीट देणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा तीव्र निषेध व्यक्त केला होता.
पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर केंद्र सरकारकडून ऑपरेशन सिंदूर राबविण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर पूजा मोरे काश्मीरमध्ये जाऊन माध्यमांशी बोलताना म्हणाल्या होत्या की, पर्यटकांना धर्म विचारून ठार मारण्यात आल्याच्या बातम्या खोट्या आहेत. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ काँग्रेसच्या खासदारांसह विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणात शेअर केला होता. या माध्यमातून सत्ताधारी भाजपवर टीका करण्यात आली होती. त्यामुळे पूजा मोरे यांची भूमिका राजकीय वादाचा केंद्रबिंदू ठरल्या होत्या. पण, माझी पत्नी सोशल मीडियाचा बळी ठरल्याचे सांगत आरक्षण मागतोय फडणवीसांची बायको नाही हे चुकीच वक्तव्य पूजा यांच्या तोंडी घातलं गेल्याचे स्पष्टीकरण पूजा यांचे पती धनंजय जाधव यांनी प्रभाग क्रमांक 1ची माफी मागितली आहे.
Amol Balwadkar Exclusive : मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न झाला पण…
तर, दुसरी आम्ही हिंदू हिंदुत्वासाठी या फेसबुकपेजवरून पहलगाम दहशतवादी हल्ल्यात धर्म विचारून हत्या झालेली नाही असे खोटे विधान करणार्या पूजा धनंजय जाधव हिला भाजपाची पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक २ ची उमेदवारी देऊन काय साध्य करायचे आहे? असे प्रश्नदेखील उपस्थित केले होते. तसेच उमेदवारी देताना पार्श्वभूमी तपासली गेली नाही का? असा प्रश्न करत भाजपच्या पारदर्शकतेवर संशय व्यक्त केला होता.
‘माझ्या पहेलगाम हल्ल्यावरील प्रतिक्रियेनंतर मी पुन्हा माझी प्रतिक्रिया दिली होती. नंतर मी अनेकदा माझी भूमिका स्पष्ट केली की, हिंदू लोकांना धर्म विचारून गोळ्या घातल्या गेल्या, पण माझा तो व्हिडिओ इतक्या मोठ्या प्रमाणात व्हायरल केला की, माझे प्रतिक्रियांचे इतर व्हिडिओ कोलॅप्स झाले’, असंही पूजा जाधव यांनी स्पष्ट केलं. याशिवाय पूजा जाधव या राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी झाल्याचेही समोर आले होते. या यात्रेदरम्यानचे राहुल गांधींसोबतचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते, ज्यामुळे त्यांची काँग्रेसशी जवळीक असल्याची चर्चा रंगली होती. पण हा फोटो चुकीचा असल्याचेही पूजा यांनी म्हटले आहे.
पुण्यात गुंडाना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देणाऱ्या अजितदादांनी हात झटकले…
असो पण, अखेर पक्षाकडून असो किंवा सोशल मीडियावर उसळलेली भाजप समर्थकांची संतापाची भावना आणि प्रश्नांची सरबत्ती या सर्वांकडे पाहता पूजा जाधव यांनी पुणे महापालिकेकडून उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्यांना पक्षाकडून तसे जाहीर करण्यास सांगण्यात आले असेल किंवा त्यांनी तो स्वःहून निर्णय घेतला असेल याबाबतचं सत्य नंतर समोर येईलच पण, जाधव यांच्या माघारीनंतर समर्थक आणि मतदारांच्या मतात आणि सोशल मीडिया किती ताकद आहे हेच अधोरेखित करणारे आहे, असे म्हटले तर, चुकीचं ठरणार नाही. एकूणच काय तर, कोणताही पक्ष मग तो भाजप असो किंवा अन्य निष्ठावान कार्यकर्त्यांच्या जोरावरचं तो विजयी पताका फडकवतं असतो पण, त्यांनाच डावलून जर, बाहेरच्यांना उमेदवारी दिल्यास काय होतं हे पूजा जाधव यांना मिळालेल्या उमेदवारीनंतर आणि त्यांच्या माघारीच्या निर्णयावरून स्पष्ट होते हे मात्र नक्की.
