Amol Balwadkar: भाजपचे (BJP) माजी नगरसेवक अमोल बालवडकर (Amol Balwadkar) यांनी प्रभाग नऊमधून जोरदार प्रचार सुरू केलाय. बाणेरमधील गावठाण भागात त्यांनी प्रचार केलाय. पुणे महानगरपालिका (PMC Election) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आलेला प्रचार दौरा अतिशय आपुलकीच्या आणि जिव्हाळ्याच्या वातावरणात झाला. बाणेर गावठाणातील नागरिकांचा प्रामाणिक प्रतिसाद आणि मनापासून केलेले स्वागत मनाला भावणारे होते.
पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का; माजी मंत्र्याच्या मुलाने हाती घेतले कमळ; प्रशांत जगताप यांच्या विरोधात देणार उमेदवारी?
या भेटीदरम्यान गावठाणातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवकांशी अमोल बालवडकर यांनी थेट संवाद साधत त्यांच्या दैनंदिन अडचणी, मूलभूत सुविधा, स्थानिक प्रश्न तसेच भविष्यातील विकासाबाबतच्या अपेक्षा समजून घेतल्या. तसेच विविध सुविधा आणि गावठाणाच्या सांस्कृतिक ओळखीला जपणारा विकास या मुद्द्यांवर नागरिकांशी चर्चा करून नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.(pmc election amol balwadakr Interacted with citizens in Baner Gaothan area
समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी स्वतंत्र नियोजन
परिसरातील समस्या तात्पुरत्या नव्हे तर कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी स्वतंत्र नियोजन व प्रभावी पाठपुरावा करण्याचा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला. विकासाच्या प्रक्रियेत गावठाण मागे राहणार नाही, तर त्याची ओळख अबाधित ठेवत आधुनिक सुविधांचा समतोल साधला जाईल, ही भावना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आली.
सोलापुरमध्ये महाविकास आघाडीचं जागावाटप फायनलं; मनसेचाही सहभाग, काय आहे फॉर्म्युला?
नागरिकांशी विश्वासाचं नांत अधिक दृढ
हा प्रचार दौरा केवळ निवडणुकीपुरता मर्यादित न राहता, गावठाणातील नागरिकांशी विश्वासाचं नातं अधिक दृढ करणारा ठरला. स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देणारी, लोकांशी जोडलेली आणि जमिनीवर काम करणारी कार्यपद्धती आम्हाला अतिशय भावली असल्याचे मत येथील नागरिकांनी मांडले.
बाणेर गावठाणातील नागरिकांनी व्यक्त केलेला विश्वास, आशीर्वाद आणि वाढता सहभाग पाहता, हा दौरा निश्चितच विश्वास देणारा आणि विजयाच्या दिशेने प्रेरणा देणारा ठरला असल्याचा विश्वास अमोल बालवडकर यांनी व्यक्त केलाय.
