पुण्यात भाजपची विजयी सुरूवात; प्रभाग 35 मधून मंजुषा नागपुरे अन् श्रीकांत जगताप बिनविरोध

सिंहगड रोडवरील प्रभाग 35 (ब) सनसिटी-माणिक बागमध्ये भाजपकडून मंजुषा नागपूरे यांना उमेदवारी देण्यात आली होती.

पुण्यात भाजपची विजयी सुरूवात; प्रभाग 35 मधून मंजुषा नागपूरे अन् श्रीकांत जगताप बिनविरोध

पुण्यात भाजपची विजयी सुरूवात; प्रभाग 35 मधून मंजुषा नागपूरे अन् श्रीकांत जगताप बिनविरोध

Manjusha Nagpur & Shrikant Jagtap Win PMC Election : पुणे महानगरपालिकेसाठीच्या मतदानापूर्वी भाजपनं पुण्यात विजयाचा श्रीगणेशा केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग ३५ (ब) मधील उमेदवार मंजुषा नागपुरे आणि ३५ (ड) मधील उमेदवार श्रीकांत जगताप हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. त्यामुळे भाजपच्या गोटात उत्साहाचं वातावरण पसले आहे. नागपुरे यांच्या या विजयामुळे आता त्यांना सलग तिसऱ्यांदा नगरसेवक होण्याचा मान मिळणार आहे. तर, श्रीकांत जगताप हे दुसऱ्यांदा भाजपच्या माध्यमातून नगरसेवक झालेले आहे.

Video : विरोधकांचं टेन्शन वाढलं; धीरज घाटेंनी पुण्यातील भाजपच्या विजयी जागांचा आकडाच सांगितला

नेमकं काय झालं?

सिंहगड रोडवरील प्रभाग 35 (ब) सनसिटी-माणिक बागमध्ये भाजपकडून मंजुषा नागपुरे यांना उमेदवारी देण्यात आली होती. या प्रभागातून नागपुरे यांच्यासह एकूण सहा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. पण, यातील दोन अर्ज छाननीवेळी बाद ठरले. तर, अन्य तीन उमेदवारांनी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी माघार घेतली. त्यामुळे नागपुरे यांची बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. तर, प्रभाग 35 (ड )सर्वसाधारण या गटातून श्रीकांत शशिकांत जगताप हे बिनविरोध विजयी झाले आहेत.

जगताप यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नितीन गायकवाड यांनी अर्ज माघारी घेतला त्यामुळे जगताप यांची बिनोरोध निवडीचा मार्क मोकळा झाला. जगताप हे दुसऱ्यांदा भाजपच्या माध्यमातून नगरसेवक म्हणून पदभार संभाळणार आहेत. अर्ज छाननी आणि अर्ज माघारीच्या वेळी प्रतिस्पर्धी उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने त्यांचा विजयाचा मार्ग मोकळा बनला.

कोट्यवधींची BMW, मर्सिडीज अन्.. पुण्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार निवडणुकीच्या निकालापूर्वीच चर्चेत

विकास दांगट ठरले किंगमेकर

काही तासात विकास दांगट ठरले किंगमेकर माघारीच्या शेवटच्या दिवशी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विकास दांगट यांनी दीड तासात उमेदवारी अर्ज प्रक्रियेची सुरवात करताच दीड तासात त्यांनी मंजुषा नागपुरे व श्रीकांत जगताप यांना बिनविरोध निवडुन आणले. या विनविरोध निवडीने सिंहगडरोड क्षेत्रिय कार्यालयात एक नवा इतिहास घडला आहे. पल्लवी शिवभाऊ पासलकर व अयोध्या पासलकर यांनी व नितिन गायकवाड यांनी माघार घेतल्यामुळे जगताप व नागपुरे यांचा बिनविरोध निवडुन येण्याचा मार्ग मोकळा झाला.

KDMC मध्ये 8 उमेदवार बिनविरोध 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण(Ravindra Chanvan) यांच्या नेतृत्वाखाली कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपने विजयाचा शंखनाद फुंकला आहे. सुरुवातीला दोन प्रभागांत भाजपचे उमेदवार बिनविरोध विजयी झाल्यानंतर पक्षाने पहिल्या विजयाचा जल्लोष केला होता. त्यानंतर रविंद्र चव्हाण प्रथमच नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या प्रभागातही भाजप(BJP) उमेदवाराची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे भाजपने केडीएमसीत(KDMC) विजयाची हॅट्रिक साधली होती. यानंतर अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत भाजपच्या बिनविरोध विजयी उमेदवारांची संख्या वाढत गेली असून, आता एकूण 8 भाजप उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

आंदेकर कुटुंबाला राजकारणात कोणी पोसले ? कलमाडी ते अजितदादा…

भाजपचे बिनविरोध निवडून आलेले उमेदवार

1.वॉर्ड 18 – रेखा चौधरी
2.वॉर्ड 26 (क) – आसावरी नवरे
3.वॉर्ड 26 (ब) – रंजना पेणकर
4.प्रभाग 24 (ब) – ज्योती पाटील
5.प्रभाग 27 (अ) – मंदा पाटील
6.प्रभाग 26 (अ) – मुकुंद पेडणेकर
7.प्रभाग 28 – महेश पाटील
8.प्रभाग क्र. 19 (क) – साई शिवाजी शेलार

Exit mobile version