Download App

“ओबीसींच्या लढ्याचा जनक अन् भुजबळांना जेलमधून बाहेर काढणारा मीच”

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

पुणे : दिल्लीतील महाराष्ट्र सदन भ्रष्ट्राचार प्रकरणात तुरूंगवास भोगलेल्या छगन भुजबळांबाबत (Chagan Bhujbal) वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठा खळबळजनक दावा केला आहे. त्यांच्या या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, भुजबळ आंबेडकरांच्या दाव्यावर नेमकं काय भुमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. छगन भुजबळ यांना जेलमधून बाहेर काढणारा मीच होतो. न्यायालयात पलटवार मीच केला. त्यांनी त्याबाबत कधी माझे आभार मांडले नाहीत. मला कोणत्याही व्यक्तीची गरज नाही. जरा इतिहास सुधारून घ्या. मग कळेल असे म्हणत ओबीसींच्या लढ्याचा जनक आपण असल्याचेही प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले आहेत.  मला परत इतिहास सांगयची गरज नाही. मंडल आयोगाबाबतचा इतिहास पाहा तुम्हाला कळेल. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. (Prakash Ambedkar Pune Press Conference )

लोकसभेच्या आखणीत ठाकरेंची सावध पावलं : पवारांशी मैत्री जपण्यासाठी दोन ‘विश्वासूंवर’ खास जबाबदारी

3 डिसेंबरनंतर दंगलीची शक्यता

देशातील कोणताही प्रश्न आपण धार्मिक चष्म्याने पाहतो, आपल्याला तशीच सवय लावली आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. तसेच 3 डिसेंबरनंतर राज्यात दंगलीची शक्यता असून, सगळ्या पोलीस स्टेशन्सला तसा अलर्ट आल्याचा दावादेखील प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. याशिवाय 6 डिसेंबरनंतर काहीही होऊ शकतं अशा सूचनादेखील पोलिसांना आहे. देशात मुस्लिमांना आणि ओबीसींना टार्गेट केलं जात असल्याचेही आंबेडकर म्हणाले आहेत.

“एकनाथ शिंदे पाकीट पोहचविणारा माणूस” : ठाकरेंवर टीका करताना राणे हीट विकेट

2024 मध्ये मोदी पंतप्रधान नसतील

यावेळी प्रकाश आंबेडकरांनी देशात सुरू असलेल्या घडामोडींवरही भाष्य केले. ते म्हणाले की, महात्मा फुले यांनी जो लढा सुरू त्याची फळे आपण चाखत आहे. सामाजिक, धार्मिक स्वातंत्र्य मिळाले. आज देशात हिंदू असूनही देशाला पुन्हा वैदिक परंपरा सुरू कराव्या अशी मागणी होत आहे.  आरआरएस किंवा विश्व हिंदू परिषदने जरी म्हटले नसेल तरी, फडणवीस यांनी जे वक्तव्य केलं त्याने संविधान बदलणार नाही. पण जोपर्यत आरआरएस प्रमुख मोहन भागवत जोपर्यंत असं वक्तव्य करत नाही तोवर आम्ही मान्य करणार नसल्याचेही यावेळी आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

Sanjay Raut : ‘तुमच्यासारखी माणसं सरकारच्या ताटाखालचं मांजर’.. राऊतांचा नार्वेकरांवर हल्लाबोल

आगामी लोकसभा निवडणुकांनंतर देशात सत्ता बदल झालेला दिसेल असा म्हणत पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी राहणार नाहीत असा दावादेखील त्यांनी केला आहे. देशातील कोणताही प्रश्न आपण धार्मिक चष्म्याने पाहतो, आपल्याला तशीच सवय लावल्याचे आंबेडकर म्हणाले.

Tags

follow us

वेब स्टोरीज