Download App

महाराष्ट्राच्या कारभाराचं कौतुक; तर राजस्थान, कर्नाटकचं उदाहरण देत काँग्रेसवर टीका

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यात विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले. लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान सोहळ्यानंतर पुणे पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर हा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी बोलताना मोदी यांनी महाराष्ट्रतील शिंदे-फडणवीस-पवार यांच्या नेतृत्वातील सरकारच्या कारभाराचे तोंड भरुन कौतुक केले. तर कर्नाटक आणि राजस्थानमधील उदाहरण देत काँग्रेसवर टीका केली. (Prime Minister Narendra Modi praised the Shinde government in Maharashtra and criticized the Congress government in Karnataka and Rajasthan.)

एका बाजूला आपण पुण्यात होत असलेला विकास पाहू शकतो आणि दुसऱ्या बाजूला आपण बंगळुरूमध्ये काय घडत आहे ते पाहू शकतो. बंगळुरू हे एक प्रमुख आयटी हब आहे, तिथे वेगाने विकास व्हायला हवा होता. मात्र मोठमोठ्या घोषणा देत तिथे सरकार स्थापन झाले. आता अल्पावधीतच संपूर्ण देश त्याचे परिणाम पाहत आहे. कर्नाटक सरकार स्वतः मान्य करते की त्यांच्याकडे बंगळुरू किंवा कर्नाटकच्या विकासासाठी पैसा नाही, राजस्थानचीही तीच परिस्थिती आहे, तिथे कर्जे वाढत आहेत आणि विकास कामे होत नाहीत, असे म्हणतं पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसच्या कारभारावर टीका केली.

पुण्यासारख्या शहरांसाठी भाजप सातत्याने काम करत आहे :

आज जग भारताच्या विकासाची चर्चा करत आहे, याचा फायदा पुण्यालादेखील होत आहे. पुण्यासारख्या शहरात क्वालिटी ऑफ लाइफ सुधारण्यासाठी भाजप सरकार सातत्याने काम करत आहे. पुणे मेट्रोचं काम जेव्हा सुरू झालं तेव्हा मला त्याचं भूमिपूजन करण्याची संधी मिळाली होती. या पाच वर्षात येथे तब्बल 24 किलोमीटर मेट्रो नेटवर्क सुरू झाल्याते यावेळी मोदींनी सांगितले. कोथरूड डेपोला याआधी कचरा डेपो होता आज तिथे मेट्रोचा डेपो उभरला आहे.

PM Modi In Pune : मोदींचे पुण्यात आगमन ते लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळा, पाहा खास फोटो

स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासामुळे भारताच्या औद्योगिक विकासाला सातत्याने चालना मिळाली आहे. भारतातील शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांचे राहणीमान सुधरायचे असेल, तर सार्वजनिक वाहतुकीचे आधुनिकीकरण करणे गरजेचे असल्याचे यावेळी मोदींनी सांगितले. 2014 पर्यंत केवळ 5 शहरांमध्ये 250 किमीपेक्षाही कमी मेट्रो नेटवर्क होतं.  पण आता देशात 20 शहरांमध्ये 800 किमीहूनही जास्त नेटवर्क तयार झालं आहे. महाराष्ट्रात पुण्याशिवाय मुंबई आणि नागपूरमध्येही मेट्रो विस्तारत आहे. पुण्यात प्रदुषण कमी करण्यासाठी मेट्रोचा विस्तार गरजेचा असल्याचेही यावेळी मोदींनी अधोरेखित केले.

Tags

follow us