जूनिअर कॉलेज अन् क्लासेसच्या ‘टाय-अप’, ‘इंटिग्रेटेड’ पद्धतीवर प्रा. दुर्गेश मंगेशकरांनी सूचवला पर्याय

Prof. Durgesh Mangeshkar-वारंवार 'टाय-अप' किंवा 'इंटिग्रेटेड' पद्धतीवर सरकारने आक्षेप घेण्यापेक्षा हे कायदेशीर करायला हवे.

Durgesh Mangeshkar

Durgesh Mangeshkar

​पुणे : राज्यातील शिक्षण क्षेत्रात सध्या कोचिंग क्लासेस आणि जुनिअर कॉलेजचे ‘टाय-अप’ वरुन नियमीत चर्चा होत असते. तसेच सरकारकडूनही ‘टाय-अप’ किंवा ‘इंटिग्रेटेड’ पद्धतीवर आक्षेप घेतले जातात. या विषयावर वर IItpk पुणे संस्थेचे संचालक प्रा. दुर्गम मंगेशकर यांनी लेट्सअप मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाष्य केले. (Prof. Durgesh Mangeshkar suggested an alternative on ‘tie-up’, ‘integrated’ method of junior college and classes)

मंगेशकर म्हणाले, वारंवार ‘टाय-अप’ किंवा ‘इंटिग्रेटेड’ पद्धतीवर सरकारने आक्षेप घेण्यापेक्षा हे कायदेशीर करायला हवे. विद्यार्थ्यांचा ताण कमी करायचा असेल, तर वास्तव स्वीकारून त्यांना अभ्यासाचे स्वातंत्र्य देणारी अधिकृत यंत्रणा उभी केली पाहिजे, असे ते म्हणाले.

​आपल्याकडे जर ज्युनिअर कॉलेजमध्ये स्पर्धा परीक्षांचे ज्ञान मिळत नसेल, तर मग विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी त्यांचा मार्ग शोधून काढला आहे. विद्यार्थ्यांनी दररोज सहा तास कॉलेजला आणि त्यानंतर तीन चार-तास क्लासला जाणे आणि त्यामध्ये परत जाण्या येण्यासाठी लागणारा वेळ यामुळे मुलं थंकून जातात. त्यामुळे त्यांना सेल्फ स्टडी करण्यासाठी वेळ मिळत नाही. यापेक्षा मुलं कोचिंग क्लासला जातात आणि त्यांना तिथेच जर बोर्ड परीक्षा आणि स्पर्धा परीक्षा यांचे मार्गदर्शन मिळत असेल तर त्यामध्ये काय गैर?, असा प्रश्न मंगेशकर यांनी उपस्थित केला आहे.

आपण नियमीत विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण येतो यावर चर्चा करतो. मात्र विद्यार्थ्यांवरील ताण कमी करायचा असेल तर त्यांना आठवी-नववी पासूनच थोडं थोडं शिकवलं तर त्यांच्यावर येणारा ताण कमी होईल आणि अकरावी बारावीमध्ये दोन वर्षात त्यांना NEET, JEE, JEE Advanced आणि इतर परीक्षांची तयारी करतात त्यांना ते सोपे होईल व त्यांच्यावरील अभ्यासाचा ताण कमी होईल. यामुळे ‘टाय अप’ आणि इंटिग्रेटेड प्रोग्रामचे आपण स्वागतच केले पाहिजे आहे.

विद्यार्थ्यांना फक्त प्रॅक्टिकल आणि टेस्ट (Internal Assessment)साठी कॉलेजला येण्याची मूभा असावी.
​स्वयं-अध्ययनाला (Self-Study) महत्त्व: जे विद्यार्थी स्वतःच्या अभ्यासाची जबाबदारी घेण्यास तयार आहेत. त्यांना स्वतंत्र पर्याय ज्युनिअर कॉलेजस्तरावर अधिकृतपणे द्यावा. यामुळे पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा ‘डमी’ कॉलेज शोधण्याचा मार्ग बंद होईल. बोर्डाच्या परीक्षेत उत्तरांचे विशिष्ट पॅटर्न महत्त्वाचे असतात, तर स्पर्धा परीक्षेत ‘प्रॉब्लेम सॉल्व्हिंग’ आणि ‘कॉन्सेप्ट’ला महत्त्व असते. ही तफावत मान्य करून दोन्ही पद्धतींचा समतोल राखणारे धोरण हवे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

कोचिंग क्लासेसकडे मुलं वळतात कारण तिथे त्यांच्या गरजा पूर्ण होतात. सरकारने याकडे आक्षेपार्ह नजरेने न बघता, बदलाचे स्वागत करावे आणि विद्यार्थ्यांना कायदेशीर मार्ग उपलब्ध करून द्यावी, असे स्पष्ट मत मंगेशकर यांनी व्यक्त केले.

Exit mobile version