Download App

Sharad Pawar यांना अनिश्चित परिस्थितीतून देशाला बाहेर काढण्याचा अनुभव

  • Written By: Last Updated:

पुणे – आत्ताचा भारतीय समाज अनेक अंगाणी ढवळून निघाला आहे. संधिग्ध आणि अनिश्चित परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा काळात शरद पवार यांच्या मार्गदर्शनाची समाजाला मोठी गरज आहे. महाराष्ट्राला आणि देशाला या परिस्थितीतून बाहेर काढण्याचा शरद पवार (Sharad Pawar) यांना अनुभव आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आ. ह. साळुंखे (A. H. Salunkhe) यांनी केले. ते पुण्यात ‘शरद पवार आणि महाराष्ट्र-भाग 1’ (Sharad Pawar and Maharashtra) या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते.

आपल्या देशाचा तीन-चार हजार वर्षांचा इतिहास बघता देशात घडलेल्या घटनांच्या नोंदी नीट प्रकारे केलेल्या नाहीत, अशी अभ्यासकांची नेहमी एक तक्रार राहिली आहे. वैदीक काळ ते आजपर्यंतच्या इतिहासातील जसेच्या तशा नोंदी पुढील पिढ्यापर्यंत पोहचवल्या नाही. याबाबत आपल्या देशात पाहिजे तेवढे कष्ट घेतले नाहीत. त्याचे फार दुष्परिणाम झाले आहेत. त्यामुळे इतिहास प्रदुषित होतो. एकाचे श्रेय दुसऱ्याकडे जाते. ज्याने मोठं कार्य केलेलं असतं त्यालाच नंतर नावं ठेवलं जातं. यासाठी आपल्याला तरुणांपर्यंत खरा इतिहास पोचवावा लागेल, असे आ. ह. साळुंखे म्हणाले.

मी गद्दारांना हलवणारच.., वरळीतून आदित्य ठाकरेंची विरोधकांवर तोफ

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीस पुढील महिन्यात ५६ वर्षे पूर्ण होत आहेत. या ५६ वर्षांत पवार यांनी महाराष्ट्राच्या (Maharashtra) विकासात भरीव योगदान दिले आहे. महाराष्ट्राच्या विकासातील त्यांचे योगदान, दूरदृष्टी ‘शरद पवार आणि महाराष्ट्र’ या ग्रंथमालिकेतून उलगडण्यात येणार आहे. पाच खंडांची ही ग्रंथमालिका असून त्यातील ‘शरद पवार आणि महाराष्ट्र-भाग १’ या पुस्तकाचे प्रकाशन आज पुण्यात (Pune) शरद पवारांच्या उपस्थितीत झाले.

राज्यातील प्रत्येक विभागांतील जिल्ह्यांमध्ये पवार यांनी दिलेल्या योगदानाचा व त्या जिल्ह्यांशी असलेल्या त्यांच्या नात्याचा आढावा घेण्यात येणार आहे. त्यातील पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांवर आधारलेल्या ‘शरद पवार आणि महाराष्ट्र-भाग १’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले.

पुस्तक प्रकाशन सोहळा पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमारे हे पुस्तकाचे संपादक, तर सुरेश इंगळे हे प्रकल्प संपादक आहेत.

Tags

follow us