Pune porsche Accident : पुण्यातील कल्याणीनगर भागात बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने कारने चिरडून (Pune porsche Accident) दोन जणांचा जीव घेतला. या प्रकरणी अल्पवयीन मुलाला जामीन मिळाला खरा मात्र त्याचे वडील विशाल अग्रवाल (Vishal Agrwal) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच विशाल अग्रवाल याने पुणे सोडलं. मात्र, पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला छत्रपती संभाजीनगरमधून अटक केलीयं. संभाजीनगर रेल्वे स्थानक परिसरातील एका पडक्या हॉटेलमध्ये तीन बॅगा, 6 जोडी कपडे आणि अंथरुणासहित विशाल अग्रवाल आढळून आला.
दिर-भावजय विरोधात कोण बाजी मारणार? वाचा, काँग्रेसचा गड शिवसेना-भाजपचा कसा झाला?
आपल्य अल्पवयीन मुलाने अपघातात दोन निष्पाप जीवांचा बळी घेतल्यानंतर विशाल अग्रवाल याने मुलाला वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतल्यानंतर अवघ्या काही तासांतच त्याची जामिनाची तजवीज विशाल अग्रवालने केली होती. मुलाचा जामिन झाल्यानंतर पुणेकरांमधून संतापाची लाट उसळली. पोलिस यंत्रणेसह अल्पवयीन मुलासह त्याच्या वडिलांवर अनेक आरोप प्रत्यारोप झाले. त्यानंतर पोलिसांनी तपास करीत विशाल अग्रवालसह मुलाला मद्य देणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले.
आपल्यावर गुन्हा दाखल झाल्याचं कळताच विशाल अग्रवाल याने फोन बंद करुन दुसरा नंबर वापरण्यास सुरुवात केली आणि पुण्यातून धूम ठोकली. त्याचा वाहनचालक चत्रभुज डोळस आणि सहकाऱ्याच्या मदतीने त्याने छत्रपती संभाजीनगर गाठलं. इथल्या एका पडक्या हॉटेलमध्ये तो वास्तव्यास होता. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी त्याने संभाजीनगरमधील एका हॉटेलमधील तीन रुम्स बुक केलेली होती. मात्र, पोलिसांनी जीपीएस ट्रॅकिंगद्वारे त्याच्यावर नजर ठेवली होती.
Akshay Kumar : खिलाडी कुमारला मोठा झटका; ‘या’ दोन सुपरस्टार्सनी सोडला चित्रपट; मोठं कारण समोर
या ट्रॅकिंगमध्ये विशाल संभाजीनगरला रवाना झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी आधी विशालचा वाहनचालक डोळस आणि सहकाऱ्याला ताब्यात घेतलं. त्यानंतर पडक्या हॉटेलमध्ये धडक देत मोठ्या शिताफीने त्याच्या मुसक्या आवळल्या. कोट्यावधींच्या कारमध्ये फिरणारा आणि अलिशान हॉटेलमध्ये राहणारा विशाल अग्रवाल हा आपल्या मुलाच्या कारनाम्यामुळे एका पडक्या हॉटेलमध्ये लपून बसला होता.
या पडक्या हॉटेलमध्ये वास्तव्यास असताना विशाल अटकपूर्व जामिन मिळण्यासाठी प्रयत्न करीत होता. आपल्याला या ठिकाणाहून पोलिस अटक करतील याची त्याला भनकही नव्हती. त्याला अटकपूर्व जामिन मिळण्याआधीच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान, अलिशान हॉटेलची सवय असणारा विशाल अग्रवाल पोलिसांच्या भीतीने संभाजीनगर रेल्वे स्टेशनच्या एका पडक्या हॉटेलमध्ये लपून बसला होता. या अपघात प्रकरणात नवनीन अपडेट येत असून पुढे या प्रकरणात काय होणार? हे पाहणं महत्वाचं ठरेल.