Download App

‘आमच्या राजकीय प्रयोगाचं कथानक चांगलं, विचार करा’; CM शिंदेंची पटेलांना थेट चित्रपटाचीच ऑफर

Eknath Shinde : ‘नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनी रंगभूमीवर केलेले धाडसी प्रयोग इतिहासातील सोनेरी पानं आहेत. ते देखील आपल्याला विसरता येणार नाहीत. राजकारणातही काही धाडसी प्रयोग केले जातात. आम्ही दीड वर्षांपूर्वी राजकारणात एक धाडसी प्रयोग केला होता त्याचीही नोंद इतिहासात नक्कीच होईल. मी जब्बार पटेल यांना सांगतो तुमच्यासाठी हे चांगलं कथानक आहे नक्की याचा विचार करा’, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी चक्क चित्रपटाचीच ऑफर दिली. चिंचवड केशवनगर येथे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन आज झाले. याप्रसंगी शिंदे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, मराठी चित्रपट अभिनेते प्रशांत दामले आदी उपस्थित होते.

Eknath Shinde : कोविड काळातील भ्रष्टाचाराच्या कथा अरेबियन नाईट्सलाही मागे टाकतील

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी शरद पवार यांच्यासमोरच जोरदार राजकीय फटकेबाजी केली. शिंदे पुढे म्हणाले, गेल्या दीड वर्षात सर्वसामान्य माणसासाठी आम्हाला जे काही करता येईल ते आम्ही केलं आहे. दीड वर्षापूर्वी सत्ताबदलाचा पहिला अंक पार पाडला. त्यानंतर राज्याच्या सर्वांगीण विकासाचा दुसरा अंक सुरू आहे. निवडणुकांनंतर विजयाचा तिसरा अंक पार पडेल त्यासाठी तुमच्या मदतीचीही गरज पडणार आहे, असा विश्वास व्यक्त केला.

मराठी नाट्य क्षेत्राला ज्या अडचणी भेडसावत आहेत तसेच कलावंतांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या नक्कीच सोडवू असे आश्वासन देत शिंदे पुढे म्हणाले,  मी देखील आपल्यातलाच एक आहे. ‘धर्मवीर’, ‘मुक्काम पोस्ट’ एक झाला दुसऱ्याचं काय असं जब्बारभाई मला विचारत होते त्यावेळी सांगितलं दुसऱ्याचं शुटींग सुरू आहे. मग तिसऱ्याचं काय म्हणाले तर मग बनवा तुम्ही असे मी त्यांना सांगितले.

CM Eknath Shinde : काहींच्या पोटात दुखतं, त्यांच्याकडे आम्हाला बघायचं नाही; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

सगळे जण आपापल्या परीने मराठी रंगभूमीवर योगदान देत असतात. प्रशांत दामले तुम्ही म्हणालात आम्ही देखील काही परफॉर्मन्स करतो. पण आम्ही नेते तुम्ही अभिनेते. रंगमंचावर तु्म्ही तुमची भूमिका बजावली की प्रेक्षक टाळ्या वाजवून दाद देतात आम्ही लोकसेवकाची भूमिका चोख बजावली की मतदार आम्हाला मतपेट्यांतून दाद देतात. मेहनत तर दोघांनाही करावी लागते. परफॉर्मन्स दोघांनाही करावा लागतो. पण आमच्यापेक्षा तुमचं काम जास्त खडतर आहे, अशा शब्दांत शिंदे यांनी कलावंतांच्या कामाचं कौतुक केले.

follow us