Download App

पुण्यात खळबळ! माजी गृहमंत्र्याच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी

  • Written By: Last Updated:

Congress Leader Avinash Bagave give lifethreat  : पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय नेत्यांना धमक्या व खंडणीसाठी फोन येत आहेत. तर काही नेत्यांच्या नावाने पैसे मागण्याचा प्रकार घडतो आहे. त्यामुळे अनेक राजकीय नेत्यांमध्ये भितीचे वातवरण तयार झाले आहे. आता तर एका माजी गृहमंत्र्याचा मुलालाच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्याचे माजी गृह राज्यमंत्री व काँग्रेसचे नेते रमेश बागवे यांचे चिरंजीव अविनाश बागवे यांना  जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.  बागवे हे काल महावीर जयंतीच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांना अनोळखी फोन नंबरवरुन व्हॉट्सअप कॉल आला 30 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. तसेच एवढी रक्कम न दिल्यास गोळ्या घालून जीवे मारण्यात येईल, अशी धमकी देखील दिली आहे.

Sushma Andhare; याचा अर्थ भक्तांची चॉईस किती फडतूस आहे हे लक्षातच आलं असेल?

यानंतर बागवे यांनी समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्यांना संरक्षण दिले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते व पुणे महापालिकेतील माजी सभागृह नेते गणेश बीडकर यांना अशाच प्रकारची जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती व त्यांना खंडणीची देखील मागणी करण्यात आली होती.

गौतमीने सांगितले इंदुरीकर महाराजांना पैशाचे गणित, तीन लाख रुपये घेतले असते तर…

तसेच मनसेचे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला देखील 30 लाख रुपयांच्या खंडणीसाठी फोन आला होता व जीवे मारण्याची धमकी आली होती.  त्यामुळे पुणे शहरात आता राजकीय नेतेच सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिकांची काय अवस्था होत असेल याबाबत चर्चा केली जात आहे.

Tags

follow us