Reelstar Sonali Hinge : पुण्यातील एका रिल्सस्टार महिला पोलिस कर्मचाऱ्याने नामंकित संस्थेतील प्राचार्य़ांकडून तब्बल 7 लाख रुपयांची खंडणी उकळली असल्याची घटना घडलीयं. या प्रकरणात रिल्सस्टार पोलिस कर्मचाऱ्यासह इतर दोन कर्मचाऱ्यांवर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलायं.
प्रसिद्ध रिल्सस्टार, महिला पोलिस सोनाली हिंगे, (Reelstar Sonali Hinge ) पोलिस उपनिरीक्षक अजित बडे, सुदाम तायडे अशी संशयित आरोपींची नावे असून या तिघांनीही शिक्षणसंस्थेच्या प्राचार्याला जाळ्यात ओढून तुमच्यावर पॉक्सो अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल होईल, अटकही केली जाईल, अशी भीती दाखवून तिघांनीही दहशत निर्माण करुन प्राचार्यांकडे 7 लाख रुपयांची मागणी केली. अटकेच्या भीतीपोटी प्राचार्यांनी ही रक्कम पोलिसांनी दिली. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार संशयास्पद वाटल्यानंतर प्राचार्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.
ना खाऊंगा, ना खाने दुंगाचा नारा पोकळ! 12 वर्षापासून मोदींच्या सहभागानेच देशाची लूट; सपकाळांचा घणाघात
पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे तक्रार प्राप्त होताच त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. प्राथमिक तपासात पोलिसाचा सहभाग अशल्याचं स्पष्ट होताच आयुक्तांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात पोलिस कर्मचारी सोनाली हिंगे हिचा समावेश असल्याने राज्यात एकच खळबळ उडालीयं.
दरम्यान, सामान्य जनतेचे रक्षण करण्यासाठी नेमलेले पोलीसच जेव्हा वर्दीचा गैरवापर करून खंडणी उकळतात, तेव्हा खाकीवरील विश्वास डळमळीत होतो. या प्रकारामुळे पुणे पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाली असून, दोषी कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
