Pune Division Graduates’ Constituency Election : पुणे शिक्षक, पदवीधर ( Pune Division Graduates’ Constituency Election) असे दोन्ही मतदार संघ महायुतीत भाजपने आपल्याकडे खेचून घेतले आहे. दोन्ही जागा भाजपच (BJP) लढणार असल्याने महायुतीमध्ये बंडखोरीचे चिन्ह दिसू लागले आहेत. पदवीधर मतदारसंघात भाजप नवा डाव खेळताना दिसत आहे. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाशी संबंधित डॉ. स्मिता पाटील-जाधव (Dr.Smita Jadhav) यांचे नाव आघाडीवर आहे.
स्मिता जाधव या शिक्षण संस्थाचालक पी. डी. पाटील यांच्या कन्या आहेत.तर दैनिक ‘पुढारी’ वृत्तसमूहाचे चेअरमन आणि समूह संपादक योगेश जाधव यांच्या पत्नी आहेत. डॉ. स्मिता जाधव या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र. कुलगुरू (Pro Vice-Chancellor) आहेत. तर डॉ. डी. वाय. विद्यापीठ सोसायटीच्या विश्वस्त सचिव आहे. डॉ. स्मिता जाधव यांचे अचानक नाव चर्चेत आले आहेत. मुंबई, पुणे, कोल्हापूर या भागात या विद्यापीठाचे मोठे शैक्षणिक जाळे आहेत. त्यांच्या नावावर भाजपने शिक्कामोर्तब केले असून, त्यांची उमेदवारी अंतिम मानली जात आहे. एक दोन दिवसांत त्यांचे उमेदवारी जाहीर होऊ शकते.
गोकुळच्या किकवी प्रकल्पावरून खळबळ, चौकशी अहवालात 13 कोटींच्या व्यवहारावर गंभीर आक्षेप
भाजपमधील अनेकांना धक्का
पुण्यातील पदवीधर मतदारसंघात भाजपमध्ये उमेदवारी मिळविण्यासाठी मोठी रस्सीखेच दिसून येत आहे. विद्यमान आमदार अरुण लाड यांचे पूत्र शरद लाड, भाजपचे नेते डॉ. मिलिंद संपगावकर या नावांची चर्चा होती. अरुण लाड हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार होते. त्यांचे पूत्र शरद लाड हे भाजपमध्ये गेलेले आहेत. त्यांना उमेदवारीची अपेक्षा होती. परंतु त्यांच्या एेवजी भाजपने मोठा धक्कातंत्र वापर डॉ. स्मिता पाटील-जाधव यांचे नाव अंतिम केल्याचे बोलले जात आहे.
महाविकास आघाडीकडून हर्षदा देशमुख ?
महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला पदवीधरची जागा मिळाली आहे. या जागेवर माजी आयएएस अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या कन्या हर्षदा देशमुख त्या निवडणुकीचा रिंगणात उतरणार आहे. प्रभाकर देशमुख हे रयत शिक्षण संस्थेवर आहेत. या संस्थेचे मोठे जाळे आहे.
