Pune Election : पुण्यात उद्धव ठाकरेंना धक्का…पृथ्वीराज सुतार आणि संजय भोसले भाजपात डेरेदाखल…

Pune Election : नगरपंचायत आणि नगरपरिषदासाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून अपेक्षेप्रमाणे भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

Pune Election

Pune Election

Pune Election : नगरपंचायत आणि नगरपरिषदासाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून अपेक्षेप्रमाणे भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. 288 पैकी भाजपने 123 पेक्षा जागांवर बाजी मारली आहे. तर दुसरीकडे आता राज्यात महानगरपालिकांसाठी रणधुमाळी पाहायला मिळत आहे. राज्यात 15 जानेवारी रोजी 29 महानगरपालिकांसाठी मतदान होणार आहे तर 16 जानेवारी रोजी राज्य निवडणूक आयोगाकडून निकाल जाहीर करण्यात येणार आहे.  मात्र त्यापूर्वीच राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. अनेक नेते या पक्षाकडून त्या पक्षाकडे जाताना दिसत आहे. यातच एक मोठी बातमी समोर आली आहे.

या बातमीनुसार, पुण्यात उद्धव ठाकरेला (Uddhav Thackeray) मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे माजी गटनेते पृथ्वीराज सुतार (Prithviraj Sutar) आणि संजय भोसले (Sanjay Bhosale) यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. पृथ्वीराज सुतार आणि संजय भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पुण्यात महानगरपालिका निवडणुकीपूर्वी भाजपची ताकद वाढली असून उद्धव ठाकरे यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे.

पुण्यात (Pune Election) काही दिवसांपासून भाजपमध्ये जोरदार इनकमिंग पाहायला मिळत आहे. अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर आता शिवसेना ठाकरे गटाचे माजी गटनेते पृथ्वीराज सुतार यांच्यासह संजय भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ उपस्थितीत होते. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीमध्ये काही दिवसांपूर्वी देखील भाजपमध्ये 22 नेत्यांनी प्रवेश केला होता.

राहुल गांधींच्या डोकेदुखीत भर घालणारे नवीन वर्ष! 2026 मध्ये सोडवाव्या लागणार 11 समस्या

नगरपंचायत आणि नगरपरिषदासाठी झालेल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून भाजपने 123 पेक्षा जास्त जागांवर बाजी मारली आहे. तर दुसरीकडे या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून 288 पैकी ठाकरे गटाला फक्त 10 जागांवर विजय मिळवता आला आहे. त्यामुळे महानगर पालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाकडून कामगिरी कशी होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Exit mobile version