Pune Ganpati Visarjan 2026 : गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान पुणेकरांना वाहतूक बदल आणि मिरवणुकीच्या मार्गाची माहिती आता एका क्लिकवर मिळणार आहे. पुणे पोलिसांकडून यासाठी diversion.punepolice.gov.in ही विशेष वेबसाईट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या माध्यमातून शहरातील प्रमुख गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकींचे मार्ग, वाहतुकीतील बदल आणि रस्त्यांची सद्यस्थिती नागरिकांना समजणार आहे.
ट्रम्प-शी जिनपिंग भेटीत AI आणि व्यापारावर चर्चा; अमेरिका-चीन जवळ येतायत, भारतासाठी नवं आव्हान?
प्रमुख गणपतींच्या मिरवणुकीची माहिती एका क्लिकवर
मानाचे पाच गणपती तसेच शहरातील प्रमुख आणि प्रसिद्ध गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका सध्या कोणत्या मार्गावरून पुढे जात आहेत, त्यांची दिशा काय आहे, याची माहिती या सुविधेवर मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांना मिरवणुकीची सद्यस्थिती समजून घेणे सोपे होणार आहे.
मिरवणूक नेमकी कुठे पोहोचली, हेही समजणार
विसर्जन मिरवणुकीतील प्रमुख गणपती सध्या कोणत्या ठिकाणी आहेत, याची माहितीही ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या सोयीनुसार मिरवणुकीच्या ठिकाणी पोहोचून गणपतींचे दर्शन घेण्याचे नियोजन करता येईल.
‘मेरी एक टांग नकली है…’ म्हणत प्रेक्षकांना हसवणारे ज्येष्ठ अभिनेते मुश्ताक खान काळाच्या पडद्याआड
कोणते रस्ते बंद? पर्यायी मार्गांचीही माहिती
मिरवणुकीचा पुढचा आणि शेवटचा भाग सध्या कुठे आहे, यावरून कोणते रस्ते बंद केले जातील किंवा पुन्हा वाहतुकीसाठी खुले केले जातील, याची माहिती नागरिकांना मिळणार आहे. तसेच वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले रस्ते, त्यावरील पर्यायी मार्ग आणि परिस्थितीनुसार वाहतूक पूर्ववत करण्यात आलेल्या रस्त्यांची अद्ययावत माहितीही या सुविधेत दिली जाणार आहे.
पार्किंगची ठिकाणेही ऑनलाइन कळणार
विसर्जन मिरवणुकीसाठी शहरात येणाऱ्या नागरिकांना वाहन पार्किंगची उपलब्ध ठिकाणे शोधणेही सोपे होणार आहे. पार्किंगसाठी निश्चित करण्यात आलेल्या जागांची माहिती या ऑनलाइन सुविधेवर उपलब्ध करून दिली जाणार आहे.
भिंगारमधील तरुणाचा मृत्यू…एसआयटी चौकशीची मुख्यमंत्र्यांकडे विनंती करणार – मंत्री राधाकृष्ण विखे
Google Maps सोबतही समन्वय
पुणे पोलिसांकडून Google Maps सोबत समन्वय साधून शहरातील रस्ते कोणत्या वेळी बंद केले जाणार आहेत आणि ते पुन्हा कधी वाहतुकीसाठी खुले होतील, याची माहिती उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडण्यापूर्वी आपल्या प्रवासाचे नियोजन करता येणार आहे.
गेल्या वर्षी कोट्यवधी नागरिकांनी घेतला होता सुविधेचा लाभ
गेल्या वर्षी तब्बल 2 कोटी 7 लाख नागरिकांनी या वेबसाइटचा वापर केला होता. यंदाही मोठ्या संख्येने नागरिक या सुविधेचा वापर करतील, अशी अपेक्षा आहे. याशिवाय विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या गणेश मंडळांसाठी आवश्यक सूचना आणि उपयुक्त माहितीदेखील वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
