पुणे पदवीधर निवडणूक, शिंदेंच्या शिवसेनेत नाराजी, निवडणुकीत नवीन ट्विस्ट येणार ?

Pune Graduate Election : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या पुणे पदवीधर निवडणुकीमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नाराजी

Pune Graduate Election

Pune Graduate Election

Pune Graduate Election : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या पुणे पदवीधर निवडणुकीमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नाराजी नाट्य दिसून येत आहे. ही जागा भाजपला सोडल्याने पक्षातील अनेक नेते नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. या निवडणुकीसंदर्भात पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट देखील घेतली आहे. या बैठकीत शिवसेनेला जागा न सुटल्याने एकनाथ शिंदे यांच्यासमोर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे तर एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत पदाधिकाऱ्यांना युतीधर्म पाळण्याच्या सूचना दिले असं सांगितलं जात आहे. बैठकीत मंत्री उदय सामंत, माजी आमदार रविंद्र धंगेकरसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

महायुतीत ही जागा भाजपच्या (BJP) वाट्याला आली होती मात्र तरी देखील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून (Shivsena) मंगेश चिवटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी मंगेश चिवटे यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने भाजप उमेदवार कौस्तुभ गावडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे भैया माने यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज शेवटच्या दिवशी मागे घेतला आहे.

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश असून 23 ऑक्टोबरला होणाऱ्या निवडणुकीसाठी 47 उमेदवार रिंगणात असून मुख्य लढत महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार हर्षदा देशमुख यांच्यात होणार आहे. तर दुसरीकडे या निवडणुकीसाठी ठाकरे गटानेही पुणे पदवीधर मतदारसंघात उमेदवार दिला आहे. पक्षाने सुनील मोदी यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

रोहित शर्माला धक्का, IPL 2027 मध्ये ‘हा’ खेळाडू होणार मुंबई इंडियन्सचा कर्णधार?-

निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक

टप्पा तारीख
अधिसूचना प्रसिद्ध 29 सप्टेंबर 2026
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 6 ऑक्टोबर 2026
अर्जांची छाननी 7 ऑक्टोबर 2026
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 9 ऑक्टोबर 2026
मतदान 23 ऑक्टोबर 2026
मतदानाची वेळ सकाळी 8 ते दुपारी 4
मतमोजणी 27 ऑक्टोबर 2026
निवडणूक प्रक्रिया पूर्ण 31 ऑक्टोबर 2026 पूर्वी
Exit mobile version