Pune : पुणे शहरात रक्ताचा तुडवडा असल्यामुळे कार्यसिद्धी प्रतिष्ठाणने (Karyasiddhi Pratisthan)कात्रज (Katraj)येथील कार्यालयाच्या आवारात भव्य रक्तदान शिबिराचे (Blood donation camp)आयोजन केले. आठ दिवस विविध ठिकाणी कार्यसिद्धी प्रतिष्ठाण हे चाकण ब्लड बँक (Chakan Blood Bank)यांच्या माध्यमातून हे शिबीर राबवत आहे. यामध्ये जवळपास 1 हजार 500 नागरिकांनी रक्तदान करुन आपले कर्तव्य बजावले आहे. 19 वर्षाच्या युवक-युवतींपासून 62 वर्षांच्या नागरिकांचा रक्तदात्यांमध्ये समावेश आहे.
TMKOC: ‘बंद करा हा शो..’ ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चा नवा प्रोमो पाहून प्रेक्षक संतापले
एकंदरीत नागरिकांचा उत्साह पाहता यापुढे जेव्हा कधी रक्ताचा तुडवडा भासेल तेंव्हा कार्यसिद्धी प्रतिष्ठाण हे शिबीर आयोजित करणार असल्याचा निर्धार प्रतिष्ठाणचे अध्यक्ष गिरीराज सावंत यांनी व्यक्त केला.
मराठा समाजाच्या सर्वेक्षणावरुन राज्य मागासवर्ग आयोगात मतभेद, तिसऱ्या सदस्याने दिला राजीनामा
याप्रसंगी पुणे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विजय (आप्पा) रेणुस, माजी सभागृह नेते सुभाष जगताप, केंब्रिज स्कूलचे चेअरमन चंद्रकांत कुंजीर, अॅड. दिलीप जगताप, रघुनाथ कड, अमर पवार, सनी काळे, प्रवीण वाखारकर, अतिश जाधव, सिद्धिविनायक ग्रुप, अखिल मोरेबाग नवरात्र उत्सव मंडळ तसेच सावंत विहार परिसरातील नागरिकांनी या प्रसंगी उत्स्फूर्तपणे उपस्थिती दर्शवली.
शिबीराचे नियोजन कार्यसिद्धी प्रतिष्ठानने अत्यंत उत्तमरीतीने केल्याबद्दल दक्षिण पुणे परिसरातील नागरिकांनी देखील कार्यसिद्धी प्रतिष्ठाणचे आभार मानले आहेत.
रक्तदानाचे फायदे
– हृदयाचं आरोग्य सुधारतं : रक्तदान केल्याने रक्तदात्याचे हृदयाचं आरोग्य सुधारतं. हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोकादेखील कमी होतो.
– लाल रक्तपेशी वाढतात : रक्तदान केल्यानंतर रक्तदात्याचे शरीर रक्ताची कमतरता भरुन काढण्याचं काम सुरु करतं. शरीरात लाल रक्तपेशी अधिक प्रमाणात तयार होतात.
– वजनात घट : रक्तदान केल्याने कॅलरीज बर्न होतात आणि वजन घटण्यासही मदत होते. शरीरात लाल रक्तपेशींचा स्तर योग्य प्रमाणात येण्यासही मदत होते.
– कॅन्सरचा धोका कमी : रक्तदान केल्यास शरीरात अधिक प्रमाणातील लोह नियंत्रणात आणण्यास मदत होते. त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो.
– निरोगी आरोग्य : रक्तदानामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होऊन रक्तदाबही नियंत्रणात राहतो.