Download App

2024 पूर्वी सुप्रिया सुळेंना मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश

Pune NCP :  राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामध्ये मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार व सुप्रिया सुळे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे अशोक टेकवडे हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. टेकवडे हे पुरंदरमधील मोठे नाव आहे. ते गेल्या अनेक वर्षांपासून पवार कुटूंबाशी एकनिष्ठ आहेत. आता त्यांनी राष्ट्रवादीली रामराम केल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. यामुळे पुरंदरमधील राजकीय गणित बदलणार असल्याचे बोलले जात आहे.

यानंतर त्यांना माध्यमांना आपली प्रतिक्रिया देखील दिली आहे. मला पक्षातील काही गोष्टी पटत नव्हत्या. याविषयमी मी सुप्रियाताई व अजितदादा यांच्याशी बोलणं केलं होतं, असे त्यांनी सांगितलं. तसेच माझ्याकडे असंख्य लोकं येतात. त्यांची कामं करावी लागतात. यासाठी मी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यासंबंधात माझी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी तीस ते चाळीस मिनीटे चर्चा झाल्याचे देखील त्यांनी सांगितले.

16 आमदारांच्या प्रकरणावरुन ठाकरे गट विधानसभा अध्यक्षांना पत्र पाठवणार?

अशोक टेकवडे हे गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादीमध्ये नाराज असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे ते राष्ट्रवादीत फार काळ राहतील असे वाटत नव्हते. आज नाही तर उद्या ते पक्ष सोडतील अशी दबक्या आवाजात चर्चा होती. शेवटी त्यांनी राष्ट्रवादी सोडण्याची निर्णय घेतला आहे.

Raj Thackeray : …अन्यथा पराभव ‘अटळ’; अटलजींचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत, राज ठाकरेंचा भाजपला सल्ला

 

दरम्यान, भाजपच्या मिशन बारामतीसाठी एक मोठा मासा त्यांच्या गळाला लागल्याची चर्चा सुरु झाली आहे. 2024 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने बारामती जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला हा मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

Tags

follow us