Pune News : ‘अजितदादा चलाख अन् धुर्त’; चंद्रकांतदादांच्या वक्तव्याने पुन्हा दादा विरुद्ध दादा?

Pune News : दिवाळी पाडव्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना भेटण्यासाठी राज्याच्या कानापऱ्यातून नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आले होते. मात्र, सर्वाधिक चर्चा अजित पवारांची होती. अजित पवार येणार का असा प्रश्न होता. अखेर या प्रश्नाचे उत्तर संध्याकाळी मिळाले. अजित पवार संध्याकाळी सहकुटुंब शरद पवार यांच्या बारामतीमधील त्यांच्या निवासस्थानी गोविंदबागेत दाखल झाले होते. […]

Pune News : 'अजितदादा चलाख अन् धुर्त'; चंद्रकांतदादांच्या वक्तव्याने दादा विरुद्ध दादा वादाचा नवा अंक?

Ajit Pawar And Chandrakant Patil

Pune News : दिवाळी पाडव्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना भेटण्यासाठी राज्याच्या कानापऱ्यातून नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आले होते. मात्र, सर्वाधिक चर्चा अजित पवारांची होती. अजित पवार येणार का असा प्रश्न होता. अखेर या प्रश्नाचे उत्तर संध्याकाळी मिळाले. अजित पवार संध्याकाळी सहकुटुंब शरद पवार यांच्या बारामतीमधील त्यांच्या निवासस्थानी गोविंदबागेत दाखल झाले होते. आता या भेटीवरून राजकारण सुरू झाले आहे. भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. पाटील यांनी पवार कुटुंब धूर्त असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता पुन्हा दादा विरुद्ध दादा हा शांत झालेला वाद पुन्हा उफाळून येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अजित पवार राजकीय दृष्ट्या अतिशय चतुर, चलाख आणि धूर्त आहेत. ते पोटात काय आहे ते ओठावर येऊ देत नाहीत, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Ajit Pawar गोविंदबागेतील दिवाळीला गैरहजर; सुप्रिया सुळेंनी सांगितलं कारण

अजित पवार सरकारमध्ये आल्यापासून भाजप नेत्यांत अस्वस्थता आहे. अजितदादा नाराज होऊ नयेत म्हणून पुण्याच्या पालकमंत्रीपदावरून चंद्रकांत पाटील यांना हटवून अजित पवार यांना देण्यात आलं. याआधीपासूनच दोन्ही नेत्यांत वाद सुरू होता. आताही चंद्रकांत पाटील यांनी खोचक टीका केली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आता अजित पवार गटाचे नेते काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

Exit mobile version