Download App

Rohit Pawar : आम्ही मुद्द्याचं बोलतो, तुम्हीही मुद्द्याचंच बोला! रोहित पवारांनी सत्ताधाऱ्यांना ठणकावलं

Rohit Pawar : मराठा आरक्षणाच्या आंदोलनात लाठीचार्ज झाला नंतर कमिटी स्थापन केली, महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या दुर्घटनेच्या चौकशीसाठी कमिटी स्थापन केली. या कमिट्यांचं पुढं काय झालं अशा कमिट्या स्थापन करून काहीच होत नसतं. राज्याचे प्रकल्प गुजरातला जातात त्याचं वाईट वाटतं. बुलेट ट्रेनसाठी कोट्यावधी खर्च करता पण, कशाला पाहिजे बुलेट ट्रेन? तोच पैसा शेतकरी, सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी खर्च करा. नाटकं न करता राज्यात गुंतवणूक कशी येईल यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, अशी विनंती करतो. युवा संघर्ष यात्रा आता काही थांबणार नाही. तेव्हा आम्ही मुद्द्याचं बोलतो तुम्हीही मुद्द्याचंच बोला, अशा शब्दांत शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्य सरकारला ठणकावलं.

आज विजयादशमीनिमित्त पुण्यात युवा संघर्ष यात्रा काढण्यात आली. यानंतर आयोजित करण्यात आलेल्या सभेत आमदार पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार श्रीनिवास पाटील, ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, प्रविण गायकवाड आदी उपस्थित होते. रोहित पवार पुढे म्हणाले, यात्रा काढावी असं म्हणणं युवकांचं होतं. त्यांनी एकत्रित येऊन विनंती केली. पुण्यात दसऱ्याच्या दिवशी एक यात्रा काढण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. आम्ही गर्दी करण्यासाठी प्रयत्न केला नाही. फक्त युवकांना विनंती केली आणि आज येथे इतकी गर्दी जमली.

“मनाला पटत नाही तिथे वेळ घालवण्यात अर्थ नाही” : नारायण राणेंच्या पुत्राची राजकारणातून निवृत्ती

आता आपल्याला संघर्ष करावाच लागेल 

आज युवकांकडे डिग्री आहे पण काम नाही. स्पर्धा परीक्षा देतात पण जाहिरात निघत नाही. मुलांच्या हाताला काम मिळत नाही याला आपण अन्याय म्हणतो. आज दुष्काळ आहे पण कुणीच चर्चा करत नाही याला म्हणतात अन्याय. आंदोलने होतात सत्ताधाऱ्यांकडून आश्वासने दिली जातात. पण पुढे काहीच होत नाही याला म्हणतात अन्याय. आता याला एकच उत्तर ते म्हणजे संघर्ष. आता आपल्याला संघर्ष करावा लागेल, असे आवाहन रोहित पवार यांनी यावेळी केले.

अधिवेशनात काय होतं. कुणी काहीतरी वक्तव्य करतं. नुसतीच टीका होते. परंतु, पवार साहेबांच्या काळात अधिवेशनात चर्चा होत होती. पण आज काय होतं तर कविता ऐकाव्या लागतात. कविता ऐकून करायचं काय? यातून युवकांच्या हाताला काम मिळणार आहे का? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला.

कंत्राटीचा जीआर रद्द केला पण, यात्रा थांबणार नाहीच 

राज्य सरकारने आताच कंत्राटी भरतीचा शासन निर्णय रद्द केला आहे.  तुम्ही एकत्रित आलात त्याचंच हे पहिलं यश तुम्हाला मिळालं. आता काही लोकं म्हणतात की यात्रा रद्द होईल पण तसं काहीच होणार नाही. यात्रा सुरुच राहणार आहे.  अडीच लाखांची पदभरतीची जाहिरात काढावी, यांसह आणखीही मागण्या आम्ही यात्रेत करणार आहोत असे आ. पवार म्हणाले.

प्रणिती शिंदेंच सोलापूर लोकसभेच्या उमेदवार! सुशीलकुमार शिंदेंनी दसऱ्यादिवशी केली अधिकृत घोषणा

Tags

follow us