Download App

पोलिसांना गुंगारा दिला, सात दिवस भटकला शेवटी पकडलाच; ‘ससून’मधील ‘त्या’ कैद्याला बेड्या

Pune News : पुणे शहरात ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणाची (Lalit Patil) पुनरावृत्ती झाली होती. ज्या पद्धतीने ललित पाटील ससून रुग्णालयातून फरार झाला होता. त्याच पद्धतीने 11 फेब्रुवारी रोजी (Pune News) आणखी एक कैदी फरार झाला होता. यामुळे पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. ललित पाटील प्रकरणातूनही पोलिसांनी काहीच धडा घेतला नाही का, असा सवाल केला जात होता. मार्शल लुईस लीलाकर असे फरार झालेल्या कैद्याचे नाव होते. या कैद्याने कुख्यात गुंड शरद मोहोळच्या (Sharad Mohol) पत्नीली जिवे मारण्याची धमकी दिली होती. या कैद्याने पोलिसांना गुंगारा देऊन ससून रुग्णालयातून पळ काढला होता. आता आठ दिवसांनंतर या कैद्याला जेरबंद करण्यात पुणे पोलिसांना (Pune Police) यश आले आहे.

आज पहाटे पावणे दोन वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला आधी येरवडा कारागृहात ठेवण्यात आले होते. यानंतर त्याने आपली तब्बेत ठीक नसल्याचे कारण पुढे केले. त्यामुळे त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले. छातीत दुखत असल्याची तक्रार त्याने 11 फेब्रुवारी रोजी सकाळी केली होती. त्याला पुढील तपासणीला घेऊन जाण्यासाठी पोलीस आले होते. याचवेळी पोलिसांची नजर चुकवून लीलाकर फरार झाला होता. या घटनेने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली होती.

ससून रुग्णालयातून आणखी एक आरोपी पळाला; कुख्यात गुंड शरद मोहोळच्या पत्नीला दिली होती धमकी

लीलाकरचा शोध घेण्यासाठी पथके तयार करण्यात आली. सायबर आणि गुन्हे शाखेचे पथक नेरळ आणि कर्जत येथे पाठवण्यात आले होते. परंतु, लीलाकर हा पु्ण्यातील येरवडा भागात त्याच्या मावशीकडे असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पथकाने त्याला लागलीच अटक केली. आता या आरोपीला पोलिसांनी बंडगार्डन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

follow us