पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते चांदणी चौकाचं उद्घाटन…

Pune News : पुणेकरांची आता वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. पुण्यातील चांदणी चौकात उभारण्यात आलेल्या नव्या प्रकल्पाचं आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. 1 ऑक्टोबर रोजी चांदणी चौकातला जुना पुल स्फोट करुन पाडण्यात आला होता. त्यानंतर चौकात नवा प्रकल्प उभा करण्यात आला आहे. या नव्या प्रकल्पामुळे चांदणई चौकातल्या वाहतूक कोंडीतून पुणेकरांची […]

Pune Chandni Chowk

Pune Chandni Chowk

Pune News : पुणेकरांची आता वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. पुण्यातील चांदणी चौकात उभारण्यात आलेल्या नव्या प्रकल्पाचं आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. 1 ऑक्टोबर रोजी चांदणी चौकातला जुना पुल स्फोट करुन पाडण्यात आला होता. त्यानंतर चौकात नवा प्रकल्प उभा करण्यात आला आहे. या नव्या प्रकल्पामुळे चांदणई चौकातल्या वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका होणार आहे.

चांदणी चौकाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती असणार आहे. पुणेस्थित पुणे-बैंगलोर राष्ट्रीय महामार्गावर हा प्रकल्प उभारला असून या चौकात कायमच वाहतूक कोंडी होत असत. त्यामुळे 1 ऑक्टोबरला जुना पूल पाडण्यात आला होता.

स्वातंत्र्यदिनी दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट, सुरक्षा वाढवली

Pune News : भिडेंना अटक करा, अन्यथा मंत्र्यांना झेंडावंदन.., संभाजी ब्रिगेडचा आक्रमक पवित्रा

या प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी छापण्यात आलेल्या पोस्टर्सवर कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांचं नाव आणि फोटो न छापल्याने कुलकर्णी नाराज झाल्या आहे. त्यांनी फेसबुकद्वारे पोस्ट शेअर करीत आपली नाराजी व्यक्त केली आहे. या पूलाच्या कामाबाबत स्वत: नितीन गडकरी यांना काही वर्षांपूर्वी सांगितलं होतं, तेव्हापासून सतत पाठपुरावा केला होता. आज मात्र, सर्व श्रेय एकट्याचेच असल्यासारखे वागणारे कोथरुडचे सद्य नेते माझ्यासारख्यांचे अस्तित्वच मिटवून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, एकीकडे चांदणी चौकाचं लोकार्पण तर दुसरीकडे भाजपच्या माजी आमदाराने नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आज होणाऱ्या लोकार्पण सोहळ्यात मेधा कुलकर्णी यांच्या नाराजीबद्दल भाजप नेते काय बोलणार? याकडं सर्वांच लक्ष लागलं आहे.

Exit mobile version