Pune Porsche Accident News : पुणे अपघात प्रकरणातील (Pune Porsche Accident) अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करण्यात आला असून त्याची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आलीयं. पोलिसांच्या तपासानंतर तो सज्ञान आहे की अज्ञान हे ठरवलं जाणार आहे. तोपर्यंत त्याला 14 दिवसांसाठी बालसुधारगृहात ठेवण्यात आलं आहे. कल्याणी नगर भागात शनिवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात जामीन मिळालेल्या अल्पवयीन बिल्डर पुत्राला आज (दि.22) बाल हक्क न्यायालयता हजर करण्यात आले. यावेळी सुनावणीदरम्यान बाल हक्क न्यायालयाने निर्णय दिला आहे.
Pune Car Accident Case | The Juvenile Justice Board remanded the minor accused to a Rehabilitation/Observation home till 5th June: Pune Police Officials
— ANI (@ANI) May 22, 2024
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगात आलिशान कार चालवत दोघांना चिरडले. त्यानंतर अल्पवयीन मुलास बाल हक्क न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी कोर्टाने अल्पवयीन मुलाला अटी शर्थींसह जामीन दिला होता. तसेच 14 दिवस वाहतूक पोलिसांसोबत काम करण्याबरोबरच अपघातावर 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची अजब शिक्षा सुनावली होती. न्यायालयाच्या या आदेशानंतर चहुबाजूकडून टीकेची झोड उठवण्यात आली होती.
या अपघाताचा संपुर्ण तपास होईपर्यंत त्याला बाल सुधारगृहात ठेवण्यात येणार आहे. अपघात प्रकरणाचा तपास पुर्ण झाल्यानंतर तो सज्ञान आहे की अज्ञान ते ठरवले जाईल. तोपर्यंत त्याला १४ दिवसांसाठी बालसुधारगृहात ठेवण्यात येणार आहे. बाल हक्क न्यायालयात 2012 साली घडलेल्या निर्भया केसचा दाखला देण्यात आला. याशिवाय देशातील काही घटनांचादेखील दाखल देण्यात आला. ज्यात अल्पवयीन आरोपींना प्रौढ म्हणून घोषित करण्यात आले होते. या सर्व घटनांचा संदर्भ पुणे पोलिसांकडून न्यायालयात देण्यात आला.
‘बाहुबली’चा कट्प्पा साकारणार मोदींची भूमिका? पंतप्रधानांचा बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
विशाल अग्रवालला तीन दिवसांची पोलीस कोठडी
कल्याणी नगर अपघात प्रकरणात वेदांत अग्रवालचे वडील विशाल अग्रवालला आज (दि.22) पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तीवाद करण्यात आला. त्यानंतर न्यायालयाने कल्याणीनगर अपघात प्रकरणी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अग्रवालसह न्यायालयाने नितेश शेवानी आणि व्यवस्थापक जयेश गावकरे यांनाही 24 मेपर्यंत कोठडी सुनावली आहे.
बाल हक्क न्यायालयाच्या निर्णयावर काय म्हणाले होते फडणवीस?
काल (दि.21 ) रोजी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तालयात भेट देत सर्व माहिती जाणून घेतली होती. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले होते. त्यावेळी कल्याणीनगर येथील अपघाताच्या घटनेमुळे लोकांमध्ये संताप आणि नाराजी पाहायला मिळाल्याचे ते म्हणाले. मी घटनेची सविस्तर माहिती घेतली असून, यात Ipc 304 लावण्यात आला आहे. हा मुलगा 17 वर्ष 8 महिन्याचा आहे निर्भयाकांडामुळे कायद्यात बदल करण्यात आल्याचेही फडणवीसांनी अधोरेखित केले. यात 16 वर्षीय वरील मुलांना एखाद्या गंभीर घटनेत अल्पवयीन आरोपीस प्रौढ ट्रीट करता येते. पण कल्याणीनगर घटनेत बाल हक्क न्यायालयाने आरोपीस अल्पवयीन असल्याचे म्हणत जामीन दिला. कोर्टाचा हा निर्णय पोलिसांसाठी धक्का होता असेही फडणवीसांनी सांगितेल होते.