Download App

पुणे पोर्श अपघात प्रकरणात ‘ड्रग्ज’ कनेक्शन? अल्पवयीन आरोपीच्या दोन मित्रांची चौकशी होणार…

आता पुणे पोर्श अपघात (Pune Porsche Accident) प्रकरणात ‘ड्रग्ज’ कनेक्शन असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Pune Porsche Accident News : गेल्या चार दिवसांपासून राज्यात पुणे शहरातील हिट अॅंड रन केस (Pune hit and run case) चर्चेत आहे. कल्याणीनगर भागात भरधाव पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची घटना घडल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळळी आहे. या अपघातात रोज नवनवे खुलासे होत आहेत. अशातच आता पुणे पोर्श अपघात (Pune Porsche Accident) प्रकरणात ‘ड्रग्ज कनेक्शन असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

फिर से दिखाऊंगा सडक पे खेल…,दोन जीव घेणाऱ्या बिल्डरपुत्राचा चीड आणणाऱ्या ‘रॅप’ व्हायरल ! 

पुण्यात १८ मे रोजी रात्री उशिरा भीषण अपघात झाला. पुण्यातील कोरेगाव पार्क येथील कल्याणीनगर परिसरात एका पोर्श कारची दुचाकीला धडक बसली. याच दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. यामुळे वातावरण तापले आहे. आता या अपघाताच्या तपासाला वेग आला असून या अपघात प्रकरणाचा ‘ड्रग्ज’ अँगलनेही तपास केला जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांनी या प्रकरणात ड्रग्ज अँगलचा तपास सुरू केला आहे. शनिवारी आणि रविवारी रात्रीच्या पार्टीत आरोपीने मित्रांसोबत दारूसह अंमली पदार्थांचे सेवन केल्याचा पोलिसांना संशय आहे.

Huma Qureshi: ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीची ‘टॉक्सिक’ चित्रपटात वर्णी, साकारणार बहिणीची भूमिका! 

वेदांत अग्रवाल याच्यासोबत त्याचे आणखी दोन अल्पवयीन मित्रही होते, असे सांगण्यात येत आहे. त्यातील एक मित्र दिल्लीचा आहे. मुलांबरोबरच त्यांच्या पालकांचीही चौकशी केली जाणार आहे. पोलिसांनी दिल्लीतील मित्राला चौकशीसाठी बोलावले आहे. दिल्लीहून येताना पालकांना सोबत आणण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.

दरम्यान, अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांना आज पोलिस आयुक्तालयात आणण्यात आले. विशाल अग्रवाल यांचीही चौकशी करण्यात आली आहे. विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांची चौकशी करण्यात आली. तर ड्रायव्हरलाही ताब्यात घेतलं आहे. जबाबात एकसूत्रता आहे का, हे पाहण्यासाठी तिघांची चौकशी झाली आहे. विशाल अग्रवाल यांची सामाजिक सुरक्षा विभागात तर सुरेंद्र अग्रवाल यांची गन्हे शाखेत चौकशी करण्यात आणलं होतं.

कल्याणीनगर अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपी विशाल अग्रवालचे वडील विशाल अग्रवाल आणि बार चालक जितेश शेवनी आणि जयेश बोनकर यांना न्यायालयाने २४ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आली आहे. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागही अॅक्शन मोडवर आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने तीन दिवसांत एकूण 32 परवाने रद्द केले आहेत. यामध्ये 10 रूफटॉप हॉटेल, 16 पब आणि 6 बार समाविष्ट आहेत. याशिवाय 297 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांवरचीही चौकशी होण्याची शक्यता…
दरम्यान, आता या प्रकरणी पोलिसांचीही चौकशी होणा आहे. हिट अँड रन प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी वेळ लावणे, वैद्यकीय तपासणीची प्रक्रिया संथ पद्धतीने करणे याबद्दल पोलिसांच्या चौकशीची शक्यता आहे. याशिवाय अल्पवयीन मुलाला व्हीआयपी सेवा दिल्याबद्दलही चौकशी होण्याची शक्यता आहे. या तपासात पोलिस दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

 

follow us

वेब स्टोरीज