Pune Porsche accident MLA Sunil Tingre got relief : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या पोर्शे कार अपघात (Pune Porsche accident) प्रकरणात आता पर्यंत विविध नावं समोर आली. त्याच्यावर कारवाई देखईल झाली. मात्र यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे (MLA Sunil Tingre) यांना मात्र पोलिसांकडून अभय मिळालं आहे.
राहुल गांधींच्या लोकसभेतील भाषणांची देशभरात चर्चा; वाचा, कुणाचा आहे पडद्यामागील ‘आवाज’?
पुणे पोलिसांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांची चार तास चौकशी केली होती. मात्र पुणे पोलिसांनी कोर्टात दाखल केलेल्या 900 पानांच्या चार्जशिटमध्ये सुनील टिंगरे यांचं नाव आलेलं नाही. त्यामुळे या प्रकरणात त्यांना अभय मिळाल्याचं दिसत आहे. पोर्शे अपघात प्रकरणी आमदार टिंगरे यांचंही नाव चर्चेत होत. अल्पवयीन आरोपीच्या वडीलाला मदत करण्यासाठी टिंगरे यांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा विरोधकांनी आरोप केला होता.
“पूजा खेडकर 47 टक्के दिव्यांग, एम्स बोर्डाचंही प्रमाणपत्र”, कोर्टात नेमकं काय घडलं..
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आमदार टिंगरे यांची तीन ते चार तास चौकशी केली. मात्र या चौकशीत टिंगरे यांनी काय जबाब दिला हे अद्याप समोर नाही. पुण्यातील येरवाडा तुरुंगात सुनिल टिंगरे काय करत होते? विशाल अग्रवालशी त्यांचा काय संबंध होता? असे अनेक प्रश्न आमदार टिंगरे यांना विचारले गेल्या असल्याची मिळतेय माहिती.
टिंगरे यांचा जबाब अद्यापही गुलदस्त्यातच…
न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या 900 पाणी चार्जशिटमध्ये अल्पवयीन आरोपीचे आई-वडिल, आजोबांचे आणि ससून मधील डॉक्टरांचे नावे. मात्र आमदार टिंगरे यांचं नाव नाही. आतापर्यंत या प्रकरणात 50 जणांचे जबाब नोंदवले आहेत. मात्र या चौकशीत टिंगरे यांनी काय जबाब दिला हे अद्याप समोर नाही. तसेच चार्जशीटमध्ये त्यांचे नाव नसल्याने या प्रकरणात त्यांना अभय मिळाल्याचं दिसत आहे.