नवी दिल्ली : पुणे शहरात १९९४ साली गाजलेल्या राठी हत्याकांडाबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा आदेश दिले आहेत. राठी मर्डर केसमधील आरोपीला तात्काळ सोडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ज्यावेळी हे हत्याकांड घडले त्यावेळी आरोपी अल्पवयीन असल्याचे तसेच त्याने घटनेनंतर २८ वर्षे तुरूंगात काढले आहेत. त्यानंतर आज या घटनेतील आरोपी नारायण चेतनराम चौधरी याला तुरूंगातून तात्काळ सोडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस, न्यायमूर्ती केएम जोसेफ आणि न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांच्या खंडपीठाने आरोपी हा गुन्ह्याच्या वेळी अल्पवयीन असल्याचा दावा योग्य असल्याचा निष्कर्ष काढल्यानंतर सोमवारी आरोपीला सोडण्याचे आदेश दिले. पुण्यातील राठी कुटुंबातील सात जणांची १९९४ साली हत्या करण्यात आली होती. गुन्हा घडला होता त्यावेळी आरोपी अल्पवयीन असल्याचं सिद्ध झालं आहे. त्यामुळे राठी हत्याकांड प्रकरणातील आरोपीला तात्काळ सोडण्याचे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले.
राठी हत्याकांड प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावलेला दोषी नारायण चेतनराम चौधरी हा आरोपी या गुन्ह्याच्या वेळी केवळ १२ वर्षांचा होता. नारायण चौधरीचे राजस्थानमधील त्याच्या शाळेतील जन्मदाखल्याची नोंद तपासली. त्यामध्ये तो अल्पवयीन होता हे सिद्ध झालं. पण तो त्याचे वय सिद्ध करू शकला नाही. कारण हा गुन्हा महाराष्ट्रात घडला होता आणि महाराष्ट्रात त्याने केवळ दीड वर्षे शिक्षण घेतलं होतं.
Veer Savarkar : …हा ठाकरे यांच्या सर्वोच्च शरणागतीचा क्षण : शिंदे-फडणवीसांचा आरोप – Letsupp
१९९४ साली पुण्यातील राठी कुटुंबातील सात जणांची हत्या करण्यात आली होती. मृतांमध्ये दोन मुलं आणि एका गर्भवती स्त्रीचा समावेश होता. नारायण चेतनराम चौधरी याने या प्रकरणात २८ वर्षे शिक्षा भोगली आहे. हा खटला सुरू असताना आरोपी नारायण चेतनराम चौधरी याचं वय २० ते २२ असल्याचं नोंद केली होती. त्या खटल्यात आरोपी चौधरी आणि त्याच्या दोन साथिदारांपैकी एक साथिदार जितेंद्र गेहलोत याने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला होता. जितेंद्र गेहलोतची फाशीची शिक्षा ही जन्मठेपेत बदलली. नारायण चौधरीने आपला दयेचा अर्ज मागे घेतला आणि गुन्हा घडला त्यावेळी आपण अल्पवयीन होतो असं सांगत एक पुनर्विचार याचिका दाखल केली होती.