Download App

पुण्यात ‘बुलेट’राजांना वाहतूक पोलिसांचा दणका, 1 हजार 768 सायलेन्सरवर थेट बुलडोझर फिरवला

Traffic Police destroys 1,768 bullet modified silencers In Pune : पुण्यातून बुलेट चालकांसाठी महत्वाची बातमी समोर (Pune) आलीय. पुणे पोलिसांनी बुलेट चालकांना मोठा दणका दिलाय. पुणे वाहतूक पोलिसांनी 1 हजार 768 बुलेट (Bullet) मॉडीफाय सायलेन्सर नष्ट केले आहेत. पुणे शहर वाहतूक शाखेकडून बुलेट मॉडीफाय सायलेन्सरच्या कर्कश आवाजावर कारवाई करण्यात आली आहे.

शहरात बुलेटच्या कर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुणे पोलिसांकडून (Pune Traffic Police) विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. शहरात सायलेन्सर विक्री करणाऱ्या व्यापारांवर देखील होणार कारवाई असल्याची माहिती मिळतेय.

महायुतीत नाराजीनाट्य, निधी वाटपावरून अजितदादांवर शिवसेनेनंतर भाजपही नाराज?

बेशिस्त वाहन चालकांकडून पुणे शहरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रकार वाढले असल्याचं समोर येतंय. बुलेट दुचाकी वाहनाच्या सायलेन्सरमध्ये फेरफार करून अथवा नवीन मॉडीफाय सायलेन्सर बसवला (Pune News) जात आहे. त्यामुळे सार्वजनिक रस्त्यावर आणि रहिवासी भागामध्ये दिवस-रात्र कर्णकर्कश आवाज करत भरधाव वेगाने बुलेटधारी फिरत असतात.

या आवाजाचा ज्येष्ठ नागरिक, महिला अन् नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतोय. याबाबत नागरिकांकडून अनेक तक्रारी प्राप्त झाल्यात. त्यामुळे अशा बेकायदेशीर सायलेन्सर बसविलेल्या दुचाकी वाहनांवर कारवाई करण्याचा आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेत. यानुसार वाहतूक शाखेतील सर्व विभागांकडून मोहीम राबविण्यात आहे.

मोठी बातमी! पाकिस्तानात आणखी एक आयसीसी टूर्नामेंट; वेळापत्रकही जाहीर

केवळ बुलेट चालक नाही तर या प्रकारच्या सायलेन्सरची विक्री करणाऱ्या अन् ते बसवणाऱ्या गॅरेज मालकांवर देखील कारवाई करण्यात येणार, अशी माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिलीय. पुणे पोलिसांच्या या कारवाईमुळे बेशिस्त बुलेटधारकांना चाप बसेल अशी अपेक्षा आहे. परंतु कारवाईनंतर बुलेट धारकांची भूमिका काय असेल, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

follow us