Puneet Balan : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती म्हणून ओळख असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची श्री गणेश अभिषेक सेवा या वर्षांपासून सुरु होत आहे. भाविकांना ऐच्छिक देणगीच्या माध्यमातून ही सेवा मिळणार असून त्यासाठी नाव नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली असल्याची माहिती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’चे उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन (Puneet Balan) यांनी दिली.
यावेळी पुनीत बालन म्हणाले की, गेल्या 133 वर्षांपासून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाचा उत्सव साजरा करण्यात येत आहे. गणपती बाप्पाचा उत्सव साजरा करताना दरवर्षी ट्रस्टकडून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात मात्र श्री गणेशाची अभिषेक सेवा अद्यापपर्यंत सुरु करण्यात आलेली नव्हती त्यामुळे भाविकांकडून अभिषेक सेवा सुरु करण्यात यावी अशी मागणी होत होती.
भाविकांच्या या मागणीचा विचार करून ट्रस्टने यावर्षीपासून अभिषेक सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’चे उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांनी दिली. या दहा दिवसांच्या उत्सव कालावधीत भाविकांना सकाळी 6 ते स. 11 यावेळेत बाप्पाचा अभिषेक करता येणार आहे. यासाठी यापूर्वी भाविकांना नाव नोंदणी करावी लागणार आहे. त्यासाठी भाविक 9112221892 या क्रमांकावर संपर्क करू शकतात किंवा http://bit.ly/abhisheksbtrgt या संकेत स्थळावर नाव नोंदणी करू शकतात. तसेच नाव नोंदणी करू न शकलेल्या भाविकांना थेट उत्सव मंडपात नाव नोंदणी केलेल्या भाविकानंतर उपलब्ध वेळेनुसार अभिषेक करता येईल.
या श्री. गणेश अभिषेकासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क निश्चित करण्यात आलेले नसून भाविकांना ऐच्छिक देणगी देऊन अभिषेक करता येणार आहे. अशी देखील माहिती पुनीत बालन यांनी दिली.
Jawa 42 FJ लाँच, बोल्ड लूक अन् भन्नाट फीचर्ससह देणार Hunter 350 ला टक्कर, किंमत फक्त …
‘‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची अभिषेक सेवा सुरु करावी अशी आग्रही मागणी असंख्य गणेश भक्तांकडून होत होती. त्यानुसार ही सेवा सुरु करण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला आहे. भाविकांनी ऐच्छिक देणगी देऊन या सेवेचा लाभ घ्यावा, ही विनंती.’’ – पुनीत बालन, उत्सवप्रमुख व विश्वस्त, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती.