Download App

गणेश मंडळांच्या आक्रमक भूमिकेनंतर महापालिका झुकली; बालन यांना काढलेली 3 कोटीच्या दंडाची नोटीस स्थगित

  • Written By: Last Updated:

पुणेः शहरात विनापरवाना जाहिराती केल्याप्रकरणी पुण्यातील उद्योजक पुनीत बालन (Punit Balan) यांच्यावर महानगरपालिकेने (Pune Muncipal Corporation) नोटीस काढली होती. बालन यांना तब्बल 3 कोटी 20 लाखांचे जाहिरात शुल्क भरण्याची ही नोटीस होती. त्यावरून पुण्यात मोठी खळबळ उडाली. बालन हे नेहमीत गणेशोत्सवात गणेश मंडळाच्या पाठीशी राहतात. त्यामुळे गणेश मंडळांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यानंतर मात्र आता महानगरपालिकेने नरमाईची भूमिका घेतली आहे. बालन यांना काढलेली नोटीस आता स्थगित करण्यात आली आहे.

Ayushman Bharat Scheme : भारत गोल्डन कार्ड कसे काढाल ?

गेल्या महिन्यात पुण्यात जोरदारपणे दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला आहे. या उत्सवात पुनीत बालन यांच्या ऑक्सिरिच कंपनीचे जाहिरात फलक अनेक ठिकाणी लावण्यात आले होते. हे फलक सार्वजनिक जागांवर लावण्यात आले होते. पालिकेने केलेल्या पाहणीत तब्बल अडीच हजार जाहिराती लावण्यात आल्याचे आढळून आले आहे. जाहिरात फलक हे कोणतीही पूर्वपरवानगी न घेता लावण्यात आल्याचे निदर्शनात आले आहे. या जाहिरातींमुळे विद्रुपीकरण झाले आहे.

राष्ट्रवादीच्या चिन्हाची सुनवाणी सुरु, स्वत: शरद पवार निवडणूक आयोगाच्या कार्यलयात उपस्थित

त्यामुळे पालिकेचे परवानगा व आकाचिन्ह विभागाचे उपआयुक्त माधव जगताप यांनी बालन यांना नोटीस काढली आहे. मंगळवारीच ही नोटीस काढण्यात आली आहे. अनधिकृत जाहिरात फलकांचे 80 हजार चौरस फुटांचे चाळीस रुपये प्रतिदिन चौरस फुटाप्रमाणे दहा दिवसांचा 3 कोटी 20 लाख रुपयांचा दंड बालन यांना करण्यात आला आहे. दंड येत्या दोन दिवसाच्या आत पुणे महानगरपालिकेच्या कोषागरात भरायचा आहे. या दंडाची रक्कम वेळेत न भरल्यास कायदेशीर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल. वसुलीची रक्कम आपल्या मिळकत करातून वसूल केली जाईल, असेही पालिकेच्या नोटीशीमध्ये होती.

ही नोटीस पाठविल्याच्या निषेधार्थ गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी महानगरपालिकेवर मोर्चा काढला. या नोटीसाला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांच्याशी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. त्यात सोमवारी यासंदर्भात बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन खेमणार यांनी दिले. तसेच बालन यांना एक दिलासा ही देण्यात आला आहे. सोमवारपर्यंत शुल्क भरण्यास स्थगिती दिली आहे.

Tags

follow us