महापालिका निवडणुकीत पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये (Election) राष्ट्रवादी अजित पवार आणि शरद पवार यांच्या दोन्ही गटाला मोठा फटका बसला. त्यानंतर आता जिल्हा परिषद निवडणूक सुरू असतानाच धक्के बसायला सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते राजेंद्र गावडे यांनी भाजपात प्रवेश केला आहे.
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासकामांच्या झंझावातामुळे आज संपूर्ण देश मोदी यांच्यावर प्रचंड प्रेम करत आहे.
काँग्रेसचे अनेक नगरसेवक संपर्कात; चंद्रपुरमध्ये भाजपचं ऑपरेश लोटस, काय म्हणाले मुंनगंटीवार?
त्याशिवाय राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गतिमान सरकार मुळे आज महाराष्ट्रात भाजपाला भरभरुन प्रतिसाद आणि आशीर्वाद मिळत आहे. ते पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळे पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याचा नेहमीच योग्य सन्मान राखला जातो. आमदार राजेंद्र गावडे यांनाही पक्षात योग्य सन्मान मिळेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी बालकल्याण समितीच्या सभापती सुनीता गावडे यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेशाबाबत भूमिका व्यक्त केली. राष्ट्रवादी पक्ष वाढवण्यासाठी गावडे कुटुंबांनी अतिशय कठोर परिश्रम घेतले. मात्र पक्ष नेतृत्वाने नेहमीच सापत्न वागणूक दिली. त्यामुळे भाजपाचा विकासाचा अजेंडा आणि कार्यकर्त्यांना मिळणारा सन्मान यामुळे आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
