जी 20 परिषेदच्या प्रदेश संयोजकानंतर आता भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे यांची पुणे महानगरपालिका निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलीय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. (Rajesh Pandey appointed as Chief Election Officer of Pune Municipal Corporation)
Odisha Train Accident : भय इथले संपत नाही! शवगृह बनलेल्या ‘त्या’ शाळेकडे विद्यार्थ्यांची पाठ
राजेश पांडे यांच्यावर आधीच जी 20 परिषदेच्या प्रदेश संयोजक पदाची जबाबदारी देण्यात आळी होती. या परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे असल्याने परिषदेच्या जनजागृतीसाठी आणि लोकांच्या सहभागाच्या विविध कार्यक्रमांसाठी पांडे यांनी अथक परिश्रम घेतले होते.
सुई-दोऱ्यापासून जेवण्याचा भांड्यांपर्यंत… माऊलींच्या पालखीची तयारी कुठे पर्यंत आली?
दरम्यान, जी 20 परिषदेनंतर राजेश पांडे यांच्यावर आता पुणे महापालिका निवडणुकीची मोठी जबाबदारी देण्यात आलीय. निवडणूक प्रमुखपदी निवड झाल्यानंतर पुणे महापालिकेत पुन्हा एकदा विजय खेचून आणण्याची जबाबदारी आपण पार पाडाल, असा विश्वास व्यक्त बावनकुळेंनी व्यक्त केला आहे.
नूकत्याच पुण्यात झालेल्या भाजप कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या सुमारास पुणे महापालिका निवडणूक होण्याचे संकेत दिले होते. त्यानंतरच त्यांची निवडणूक प्रमुखपदी निवड झाल्याने आगामी निवडणुकीत राजेश पांडे कशी रणनीती आखणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.