Rohit Pawar On AAIB Report : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघात मृत्यूप्रकरणी एएआयबीचा ( Air Accident Investigation Bureau) प्राथमिक अहवाल आला आहे. या अहवालात अजित पवार यांच्या विमानाचा अपघाताचे कारणे सांगितले आहे. कमी दृशमानता, बारामती विमानतळाची धावपट्टी, वैमानिकाने विमान उतरविण्याचा घेतलेल्या निर्णयामुळे हा अपघात झालेला आहे. अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झालेला नसून, तो घातपात असल्याचा आरोप आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) घेतलेला आहे. अहवालावर रोहित पवार यांनी शंका उपस्थित करत काही त्रुटी दाखविल्या आहेत.
या अहवालानंतर रोहित पवारांना एक्सवर ट्वीट केले. प्राथमिक अहवालात AAIB ने कोणता प्राथमिक निष्कर्ष काढला? CID या अहवालाचा आधार घेऊन कसा तपास करणार आहे? असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केलाय. या अहवालातील पान क्रमांक 4 वरील मुद्दा 5.1 मधील “Baramati Airfiled is situated in the Baramati District of the state Maharashtra” हे वाक्य आहे. AAIB ने हा अहवाल किती गांभीर्याने बनवला हे दाखवण्यासाठी पुरेसं आहे. परवा मुंबईत यावर विस्तृत बोलणार असल्याचे रोहित पवारांनी म्हटलंय.
प्राथमिक अहवालातील महत्त्वाचे मुद्दे
पहिल्या लँडिंग प्रयत्नानंतर पायलटने Go-Around केले.
दुसऱ्या प्रयत्नावेळी रनवे 11 वर लँडिंग क्लीअरन्स मिळाले
अपूर्ण पायाभूत सुविधा असलेल्या अनियंत्रित विमानतळावर लँडिंग झालं.
दृश्यमानता किमान मर्यादेपेक्षा कमी असताना लँडिंगचा प्रयत्न झाला.
अंतिम क्षणी कॉकपिटमधून “Oh S**t…” असा आवाज आला
विमान रनवेच्या डाव्या बाजूला सुमारे 50 मीटर अंतरावर कोसळले
विमान प्रथम झाडांना धडकले आणि नंतर ते जमिनीवर आदळले
अपघातानंतर विमानाला आग लागली, कॉकपिट आणि केबिन पूर्णपणे जळाले.
अपघाताच्या अंतिम कारणांचा तपास अद्याप सुरू.
रन वेवरील मार्किंग सहज दिसू शकतील असे नाहीत.
रन वेवर बारीक खडी (Loose Gravels) आढळली.
रन वेला परिपूर्ण कुंपण (Boundary Wall) नाही.
विमानतळावर अग्निशमन (ARFF) सुविधा नाही.
फक्त VFR ऑपरेशन्सला परवानगी.
अनकंट्रोल्ड एअरफिल्ड आहे, नियमित ATC सुविधा नाही.
ब्लॅक बॉक्स (Flight Recorders)
FDR (Flight Data Recorder) डेटा यशस्वीरित्या डाउनलोड
CVR (Cockpit Voice Recorder) थर्मल डॅमेज; डेटा पुनर्प्राप्तीसाठी NTSB (USA) मदत तपास अद्याप सुरू
प्राथमिक अहवालात AAIB ने कोणता प्राथमिक निष्कर्ष काढला? CID या अहवालाचा आधार घेऊन कसा तपास करणार आहे?
या अहवालातील पान क्रमांक ४ वरील मुद्दा ५.१ मधील “Baramati Airfiled is situated in the Baramati District of the state Maharashtra” हे वाक्य AAIB ने हा अहवाल किती गांभीर्याने… pic.twitter.com/wBqnip7tjA
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 28, 2026
