RPO Pune Conducts Open House : प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय (RPO) पुणे यांच्या वतीने पासपोर्ट सेवा केंद्र (PSK), मुंढवा येथे नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी आणि सुचना जाणून घेण्यासाठी ‘ओपन हाऊस’ सत्राचं आयोजन करण्यात आलं. या उपक्रमामुळे नागरिकांना थेट अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची आणि पासपोर्ट सेवांबाबत आपले प्रश्न, अडचणी तसेच सुधारणा सुचना मांडण्याची संधी मिळाली.
या सत्रादरम्यान RPO पुणे (Pune) येथील अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारींचं वेळीच पारदर्शक निवारण (Open House for Public Grievances) केलं जाईल, असा विश्वास दिला. तसेच पासपोर्ट सेवा (Passport) अधिकाधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचं स्पष्ट केलं.
पुणे RPO दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी नियमितपणे अशा ‘ओपन हाऊस’ बैठका आयोजित करतं. यामागचा उद्देश म्हणजे नागरिकांचा विश्वास अधिक दृढ करणे आणि सेवा पुरवठ्यात सुधारणा करणे हा आहे. पुढील ‘ओपन हाऊस’ सत्र 12 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 3 ते 5 वाजता RPO पुणे, बाणेर–पाषाण लिंक रोड येथे होणार आहे. पासपोर्टशी संबंधित प्रश्न किंवा तक्रारी असलेले सर्व नागरिक यात सहभागी होऊ शकतात.
मात्र, सर्व इच्छुकांनी यासाठी पूर्वनोंदणी करणं आवश्यक आहे. नोंदणीसाठी नागरिकांनी rpo.pune@mea.gov.in या ईमेलवर मेल पाठवावा लागेल. नोंदणीची पुष्टी करणारा ईमेल मिळाल्यानंतरच संबंधित नागरिकांना प्रवेश दिला जाईल, असेही कार्यालयाने स्पष्ट केले आहे.