गुणपत्रिकेच्या रागातून पित्यानेच घेतला मुलीचा जीव, दौंड तालुक्यातील देउळगाव राजे हादरले

मुलगी अनामिका हिने भावाच्या गुणपत्रिकेत खाडाखोड केल्याचा राग मनात धरून त्याने संतापाच्या भरात थेट टोकाचा निर्णय घेतला.

News Photo   2026 05 05T191847.245

गुणपत्रिकेच्या रागातून पित्यानेच घेतला मुलीचा जीव, दौंड तालुक्यातील देउळगाव राजे हादरले

मानवी नात्यांनाच काळिमा फासणारी (Exam) अत्यंत हृदयद्रावक घटना दौंड तालुक्यातील देउळगाव राजे येथे उघडकीस आली आहे. केवळ शाळेच्या गुणपत्रिकेवरून झालेल्या वादातून एका पित्याने स्वतःच्या 9 वर्षांच्या निष्पाप मुलीची निर्घृण हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 282/2026 नुसार दाखल फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, आरोपी शांताराम दुर्योधन चव्हाण (वय 33) याने 3 मे 2026 रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास आपल्या राहत्या घरी ही भीषण घटना घडवली. मुलगी अनामिका हिने भावाच्या गुणपत्रिकेत खाडाखोड केल्याचा राग मनात धरून त्याने संतापाच्या भरात थेट टोकाचा निर्णय घेतला.

Video : धक्कादायक! SRPF भरतीत परीक्षेत महाघोटाळा, 100 पैकी तब्बल 85 प्रश्नांचा मोठा घोळ

आरोपीने लाकूड कापण्याच्या मशीनचा वापर करून मुलीच्या गळ्यावर, डोक्यावर आणि शरीरावर वार करत तिला जागीच ठार केले. या अमानुष कृत्यानंतरही तो थांबला नाही. गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याने मुलीचे प्रेत कपड्यात गुंडाळून घराला आग लावली, जेणेकरून हा प्रकार अपघात असल्याचे भासवता येईल.

या प्रकरणात आरोपीसोबत असलेल्या चिंगु शिंदबाद भोसले हिनेही ही घटना लपवून ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. तिने कोणालाही माहिती देऊ नये असे सांगून पोलिसांपासून सत्य दडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

या घटनेमुळे संपूर्ण दौंड तालुका हादरला असून, ज्या वयात मुलांना संरक्षणाची गरज असते, त्याच वयात घरच्यांकडूनच असा क्रूर अंत होणे, ही समाजासाठी अत्यंत चिंताजनक बाब आहे, अशा भावना नागरिकांतून व्यक्त होत आहेत.
पोलीसांनी दोन्ही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Exit mobile version