Nilesh Lanke : मी कधी आमदार होईल याचा विचार स्वप्नातही केला नव्हता पण पवार साहेबांमुळं आमदार झालो. आमदार झाल्यानंतर चिमटा घेऊन पाहिला खरंच आमदार झालो की काय..राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही तुम्ही फक्त आशावादी राहा, अशा शब्दांत खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी पक्ष कार्यकर्त्यांना ताकद दिली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापनदिन कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.
लंके पुढे म्हणाले, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत अनेक बदल झाले. काहींनी अनेक तर्क लावले. पण अडचणीच्या काळात जो पक्षाला साथ देऊ शकतो. पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकतो तोच खऱ्या अर्थाने पवार साहेबांचा मावळा आहे. आता कसं होईल याचा विचार करू नका. संघर्ष करण्याची तयारी ठेवा. दिवसभर लोकांत राहा. त्यांच्या सुखदुःखात सामील व्हा त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांना मदत करा मग जनताही तुमच्या पाठीशी उभी राहते. संकटात संधी पाहिली पाहिजे.
Video : मला प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करा; दमदार भाषण केल्यानंतर जयंतरावांचे राजीनाम्याचे संकेत
मी पवार साहेबांबरोबर असताना त्यांना एकदा विचारलं की या वयातही तुम्ही इतकी धावपळ करता. तुम्ही हेलिकॉप्टर वापरा, छोटं विमान वापरा त्यावर पवार साहेब म्हणाले मी ज्यावेळेस गाडीने फिरतो तेव्हा मी केलेले नेमके काय बदल झाले आहेत. आणखी काय अपेक्षित आहे असा विचार करणारा नेता म्हणजे पवार साहेब आहेत. त्यांनी मला सांगितलं की मी गाडीतून उतरल्यानंतर काय करतो यावर फक्त लक्ष दे. एका ठिकाणी हार घेऊन काही कार्यकर्ते थांबले होते. साहेब गाडीतून उतरले. त्यांनी विचारलं किती पाऊस झाला. शेतात काय माल आहे, किती पैसे मिळतात.. असा दूरदृष्टी असणारा नेता आपल्या सगळ्यांच्या भाग्यात आहे यापेक्षा आणखी वेगळं काय पाहिजे, असेही खासदार निलेश लंके म्हणाले.
धीर धरा जेव्हा आपण हाफ चड्डीत होतो..
शरद पवार गटातील काही जणांनी अजितदादांबरोबर चला म्हणून आग्रह धरला आहे. त्यांना निलेश लंके यांनी सुनावले. जरा धीर धरा. काहींना खूप घाई झाली आहे. थांबाना जरा आपला नेता आहे. आपलं वय नाही तेवढं या नेत्याचं राजकीय वय आहे. आपल्या नेत्याला राजकारणातील फायदे तोटे, सगळी गणितं माहिती आहेत आणि आपण त्यांना सल्ला द्यायला चाललो आहोत. आपण अजून अंड्यात आहोत. जेव्हा आपण हाफ चड्डीत होतो तेव्हा ते देशाच्या राजकारणात होते,