Supriya Sule on Deenanath Mangeshakr Hospital : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Deenanath Mangeshkar Hospital) वेळेत उपचार मिळाले नाहीत म्हणून तनिषा भिसे या (Tanisha Bhise) गर्भवती महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेची सध्या चौकशी सुरू आहे. त्यातच आता ससून रुग्णालयाने एक अहवाल पुणे पोलिसांना दिला होता. या अहवालात त्या रुग्णालयाला क्लीनचीट देण्यात आली आहे. या अहवालावर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) चांगल्याच संतापल्या आहेत. हा अहवाल आम्हाला मान्य नाही तो जाळून टाका असा आक्रमक पवित्रा खासदार सुळे यांनी घेतला.
खासदार सुळे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर मते व्यक्त केली. सुळे पुढे म्हणाल्या, ससून रुग्णालयाने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेबाबत जो अहवाल दिला आहे त्याचा आम्ही निषेध करतो. सरकार किती असंवेदनशील आहे हेच यातून दिसत आहे. एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतरही सरकारकडून कारवाई होत नाही. परंतु, त्या माऊलीला न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
मंगेशकर कुटुंब लुटारूची टोळी, माणुसकीच्या नावावर कलंक.. तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी वडेट्टीवार भडकले
ससून रुग्णालयाच्या समितीने दिलेला अहवाल आम्ही स्वीकारत नाही. हा अहवाल कचऱ्याच्या डब्यात टाकाअ असे मी म्हणणार नाही तर तो सरळ जाळूनच टाका असा संताप खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय शरद पवार राष्ट्रवादीचे नेते प्रशांत जगताप यांनी घेतला आहे. या प्रकरणात आम्ही सर्व प्रशांत जगताप यांच्या पाठीशी आहोत असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. प्रशांत जगताप 24 एप्रिल रोजी मंगेशकर रुग्णालयाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत.
दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या समितीने रुग्णालयावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. यापूर्वी मृताच्या कुटुंबीयांनीही रुग्णालयावर आरोप केले होते. कुटुंबातील सदस्यांच्या म्हणण्यानुसार, 10 लाख रुपये घेऊनही रुग्णालय प्रशासनाने महिलेला उपचारासाठी दाखल केले नाही आणि उपचारांना उशीर झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला.
मणिपुरात पु्न्हा हिंसाचार, कर्फ्यू लागू, शाळा अन् बाजार बंद; वादाचं कारणही धक्कादायक
याप्रकरणी राज्य सरकारच्या समितीच्या अहवालात असेही म्हटलंय की, रुग्णालयाने गर्भवती महिला साडेपाच तास तिथे राहिली परंतु ती कोणतीही माहिती न देता निघून गेली. समितीने म्हटलंय की, रुग्णालयाने रुग्णाला ‘गोल्डन अवर्स’ उपचार देण्याचा नियम पाळला नाही. या प्रकरणात पुढील कारवाईसाठी धर्मादाय आयुक्तांना शिफारस करण्यात आली आहे.