Download App

पवार कुटुंबावर शोककळा! शरद पवारांचे धाकटे बंधू प्रतापराव पवार यांच्या पत्नी भारती पवार यांचं निधन

Prataprao Pawar Wife Bharati Pawar passed away : पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या पत्नी भारती पवार यांचं निधन (Bharati Pawar) झालंय. भारती पवार मागील काही दिवसांपासून आजारी होत्या. भारती प्रतापराव पवार (वय 77 वर्षे) यांचे आज सायंकाळी दीर्घआजाराने निधन झालंय. ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्यामागे मुलगा ‘सकाळ’चे व्यवस्थापकीय संचालक (Pune) अभिजित पवार, सून मृणाल, नातवंडे जान्हवी आणि राहुल तसेच मुलगी अश्विनी, नातू झाकीर असा परिवार आहे.

भारती पवार यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी 12 वाजता पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत. भारती पवार या गेल्या सहा महिन्यांपासून आजारी होत्या. त्या पूर्वाश्रमीच्या भारती श्रीपतराव पाटील होत. मूळच्या मुंबईतील असलेल्या भारती (Bharati Pawar passed away) यांचे बालपण शिवाजी पार्क परिसरात गेले. त्यांचे शालेय शिक्षण तेथील बालमोहन विद्या मंदिरात झाले. रुईया महाविद्यालयातून त्यांनी कला शाखेची पदवी घेतली. चित्रकलेत त्यांचा हातखंडा असल्यामुळे पुढे त्यात त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली. त्यानंतर 22 ऑगस्ट 1970 रोजी त्यांचा प्रतापराव पवार यांच्याशी विवाह झाला.

सर्वात मोठं डिजिटल अरेस्ट स्कॅम! 86 वर्षीय महिलेची 20 कोटींची फसवणूक, मुंबईत भयंकर घडलं

सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे पुण्यात आल्यावर ‘सकाळ’च्या माध्यमातून त्या अनेक उपक्रमांत सहभागी होत. औंधजवळील बालकल्याण संस्थेमध्ये त्या सुमारे 35 वर्षे सक्रिय होत्या. तेथे त्या विश्वस्तही होत्या. बालकल्याण संस्थेतील प्रत्येक उपक्रमात त्या सहभागी होत. अनेक मुला-मुलींना त्यांनी तेथे चित्रकलेचे धडे दिले. तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांशीही त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. तसेच ‘सकाळ’ (Prataprao Pawar Wife) संचलित कोरेगाव पार्क आणि कोथरूड येथील अंधशाळेतही त्या विश्वस्त होत्या. तेथील अनेक उपक्रमांत त्या सहभागी होत.

अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजाचा येरवडातील मुक्काम वाढला; जामिनावर 20 मार्चला सुनावणी होणार

अतिशय दुःखी अंतःकरणाने कळविते की, माझ्या काकी सौ. भारती प्रतापराव पवार यांचे थोड्या वेळापूर्वी निधन झाले. ही आम्हा सर्वांसाठी अतिशय दुःखद घटना आहे. याक्षणी काकींच्या असंख्य आठवणींनी मनात घर केले आहे. त्या माझ्यासाठी आईसमान होत्या. त्यांनी आम्हा सर्व भावंडांवर सदैव खुप प्रेम केले. आम्हा सर्व भावंडांना त्यांनी दिलेली प्रेमळ साथ सदैव लक्षात राहील, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी भारती पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

भारती काकी आमच्यात राहिल्या नाहीत यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. त्या आम्हा सर्वांना आईसमान होत्या. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून हृदय दुःखाने पिळवटून गेले आहे. त्यांनी सर्व पवार कुटुंबावर निस्वार्थ प्रेम केले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, असं म्हणत सुनेत्रा पवार यांनी भारती पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

 

follow us