पुण्यातील शिवाजीनगरच्या एसटी बसस्थानकाचा होणार कायापालट!; 825 कोटींचे अत्याधुनिक बसस्थानक उभारणार

Shivajinagar ST Bus Stand Redevelopment; जुन्या एसटी बसस्थानकाच्या जागेवर राज्यातील सर्वात मोठे आणि अत्याधुनिक बसस्थानक उभारण्यात येणार आहे.

Shivajinagar ST Bus Stand Redevelopment

Shivajinagar ST Bus Stand Redevelopment

Shivajinagar ST Bus Stand Redevelopment: पुणे: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शिवाजीनगर (Shivajinagar Pune) येथील जुन्या एसटी बसस्थानकाच्या जागेवर राज्यातील सर्वात मोठे आणि अत्याधुनिक बसस्थानक उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी तब्बल 825 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) आणि महा मेट्रो यांच्यात यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला.

अमेरिकेत ट्रम्प यांना मोठा धक्का; दोन्ही सभागृहांत डेमोक्रॅट्सचं बहुमत, भारताचा फायदा की तोटा?

गेल्या पाच वर्षांपासून शिवाजीनगर बसस्थानकाच्या पुनर्विकासासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर या पाठपुराव्याला यश आले आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर हा प्रकल्प उभारण्यात येणार असून, पुढील महिन्यात त्याचे टेंडर काढले जाणार आहे. प्रकल्पाचे बांधकाम 3 ते 4 वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

बसस्थानकात कोणत्या सुविधा मिळणार?

या नव्या बसस्थानकात प्रवाशांसाठी अत्याधुनिक प्रतीक्षागृह, बस पार्किंग, स्वतंत्र वर्कशॉप आणि विविध व्यावसायिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळण्यास मदत होणार आहे.

जगभरात इंधन संकटाची चिंता, पण भारतासाठी इराणचा मोठा निर्णय, होर्मुझचे दरवाजे चार देशांसाठी खुले

या प्रकल्पाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे बसस्थानक केवळ एसटी प्रवासापुरते मर्यादित राहणार नाही. मेट्रो, रेल्वे, पीएमपीएमएल बससेवा आणि रिक्षा वाहतुकीला एकाच ठिकाणी जोडले जाणार आहे. त्यामुळे शिवाजीनगर हे पुण्यातील महत्त्वाचे एकात्मिक वाहतूक केंद्र म्हणून विकसित होणार आहे.

दररोज एक लाखांहून अधिक प्रवाशांना फायदा

खानदेश, मराठवाडा, विदर्भ आणि मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हे बसस्थानक महत्त्वाचे ठरणार आहे. दररोज एक लाखांहून अधिक प्रवाशांना या प्रकल्पाचा थेट फायदा होण्याचा अंदाज आहे. बसस्थानकाच्या पुनर्विकासामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर होण्यासोबतच शिवाजीनगर परिसरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेलाही नवी दिशा मिळणार आहे.

Sugarcane Agitation : 30 तास उलटले तरी तोडगा नाही; ऊस आंदोलनाची धग वाढली..आता पर्यायी मार्गही रोखले!

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पासाठी एसटी महामंडळ आणि महा मेट्रो यांच्यात करार झाला आहे. आता टेंडर प्रक्रिया आणि प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात होते, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version