तहसीलदारांवर कारवाई करण्याच्या मागणीचा फलक हातात घेत एका तरुणाने जीवघेणं आंदोलन केलं आहे. पुण्यातल्या संचेती रुग्णालयाजवळ असलेल्या उड्डाणपुलावर चढून तरुणाने शोले स्टाईल आंदोलन सुरु केलंय. तरुणाच्या या आंदोलनामुळे परिसरातील वाहतुक कोंडी झाली आहे.
'तहसीलदारावर कारवाई करा', पुण्यात तरुणाचं पुलावर चढून शोलेस्टाईल आंदोलन…
–#puneprotest #punenews #sancheti #pune pic.twitter.com/KhkwVQzAbw— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) May 30, 2023
अचानक तरुणाने जीवघेणं आंदोलन सुरु केल्याने प्रशानाची एकच धांदल उडाली आहे.आंदोलनाची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. तहसीलदारावर कारवाई करा अन्यथा खाली उडी मारुन जीव देणार असल्याची धमकी तरुणाकडून वारंवार देण्यात आहे.
मिळालेल्या माहितीनूसा, हा तरुण संचेती चौकातल्या उड्डाणपुलाच्या खांबावर चढला आहे. शासनाने तहसीलदारांवर कारवाई नाही केली तर मी इतक्या उंचावरुन उडी मारणार असल्याची धमकी देत आहे. या तरुणाच्या हातात एक बॅनर असून त्यावर तहसीलदारांवर कारवाई करा, असं लिहिण्यात आलं आहे.
दरम्यान, घटनास्थळी पोलिसही दाखल झाले असून या तरुणाच्या बचावासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. पण पोलिसांनाही त्यानं उडी मारण्याची धमकी देत जुन्नरच्या तहसीलदारावर कारवाई करावी ही आपली मागणी लावून धरली आहे.