Vikram Kakade on Umesh Patil : राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेत. पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार विक्रम काकडे ( Vikram Kakade) यांनी प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) यांच्यावर जाहीरपणे जोरदार टीका केलीय. पल्याबाबत पैसे देऊन आमदार झाल्याची चर्चा केली जात असल्याचा दावा करत काकडेंनी उमेश पाटील यांना थेट इशारा दिला. तसेच, पार्थ पवारांचे कान भरणे बंद करा, असेही त्यांनी सुनावले आहे.
पुण्यातील मावळ येथे आमदार सुनील शेळके यांच्या वतीने आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्यात विक्रम काकडे बोलत होते. यावेळी त्यांनी उमेश पाटील यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. काही जणांकडून आपण पैशांच्या जोरावर आमदार झाल्याची चर्चा केली जात असल्याचे काकडे म्हणाले. काही लोक म्हणतात की विक्रम काकडे पैशांच्या जीवावर निवडून आले. पवारांना पैसे दिले म्हणून मला संधी मिळाली. मात्र, या बाहेरच्या लोकांना माझे आणि अजित पवारांचे संबंध माहिती नाहीत. पार्थ पवार माझे लहानपणापासूनचे मित्र आहेत, असे काकडे म्हणाले.
ठाकरेंच्या निर्णयाने शिवसैनिकांमध्ये मोठी खळबळ, उमेदवारीवरुन पुन्हा नाराजीचा सूर उमटला
‘पवार कुटुंबाला विकत घेऊन आमदार होणारा महाराष्ट्रात जन्माला आलेला नाही-काकडे
सोलापूरहून एक पार्सल आले आहे, उमेश पाटील नावाचे. त्या व्यक्तीने पैसे देऊन आमदार झालो, असे बोलून दाखवले. उमेश पाटील यांना सांगायचं आहे की पवार कुटुंबाला विकत घेऊन आमदार होणारा अद्याप महाराष्ट्रात जन्माला आलेला नाही, असे काकडे म्हणाले.
आपल्याबाबत अशा प्रकारच्या चर्चा वारंवार केल्यास लोकांना कालांतराने असत्य गोष्टही खरी वाटू शकते, असेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे अशा चर्चा तातडीने थांबवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
विष पचवायची तयारी ठेव आणि त्याचे दात उपसायची हिम्मतही; वडिलांचा रोहित पवारांना कानमंत्र
‘पार्थ पवारांचे कान भरणे बंद करा’
असल्या गोष्टी बंद करा. पार्थ पवारांचे कान भरणे बंद करा. उमेश पाटील, माझ्या नादाला लागू नका, असा थेट इशारा विक्रम काकडे यांनी दिला. आपल्याबद्दल सुरू असलेली चर्चा थांबली नाही, तर बघून घेऊ, असा इशाराही काकडे यांनी दिला. पक्षातीलच एका व्यक्तीकडून आपल्याबाबत अशा प्रकारची वक्तव्ये होत असल्याने आपल्याला वाईट वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले.
सुनेत्रा पवारांनी कार्यकर्त्यांसाठी मंत्रिपद घेतले
सुनेत्रा पवार यांनी आपल्या कुटुंबासाठी नव्हे, तर आपल्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी मंत्रिपद घेतले आहे. दादांनी आपल्या प्रत्येकाला मदत केली. आता त्याची परतफेड करण्याची गरज आहे. पार्थ पवार आणि जय पवार हे दुःखातून सावरून पक्षासाठी काम करत आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर झालेल्या विधान परिषद निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताकदीमुळे बिनविरोध झाल्याचा दावाही काकडे यांनी केलाय. पुण्यातील विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होण्यात शरद पवारांचे योगदान असल्याचे त्यांनी म्हटले.
राष्ट्रवादीमधील मतभेद चव्हाटावर
विक्रम काकडे यांनी थेट पक्षाच्या प्रवक्ताला सुनावले आहेत. त्यावरून राष्ट्रवादीतील अंतगर्त मतभेट चव्हाटावर आले आहेत. याबाबत उमेश पाटील यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.
